Join us
Daily Top 2Weekly Top 5

सनी लिऑनविरोधात डोंबिवलीत गुन्हा दाखल

By admin | Updated: May 15, 2015 15:11 IST

बॉलीवूडमध्ये 'बेबी डॉल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सनी लिऑन तिच्या पॉर्न फिल्म्समुळे अडचणीत आली आहे.

ऑनलाइन लोकमत 

डोंबिवली, दि. १५ - बॉलीवूडमध्ये 'बेबी डॉल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सनी लिऑन आता अडचणीत आली आहे. सनी लिऑनविरोधात डोंबिवलीतील रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून इंटरनेटवर अश्लील व्हिडीओ अपलोड करुन अश्लीलता पसरवण्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला आहे. 
पॉर्न इंडस्ट्रीतून बॉलीवूडमध्ये आलेली सनी लिऑन आता भारतात स्थिरावली असून तिची लोकप्रियता दिवसेगणिक वाढत आहे. बॉलीवूडमध्ये नाव कमावत असूनही सनी लिऑनने तिची पॉर्न वेबसाईट अद्याप सुरुच आहे. याप्रकरणी डोंबिवलीतील एका महिलेने रामनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. आयटी अ‍ॅक्ट अंतर्गत सनी लिओनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.