Join us
Daily Top 2Weekly Top 5

आई-बाबांसोबत फोटोत पोझ देणाऱ्या मुलीला ओळखलंत का?, आज छोट्या पडद्यावरील आहे लोकप्रिय चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 15:47 IST

फोटोत आईच्या कडेवर असलेली ही क्युट मुलगी आज मराठी सिनेसृष्टीतल्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

सध्या सोशल मीडियावर बालपणीच्या फोटोंचा ट्रेंड पाहायला मिळतो. या ट्रेंडमध्ये सेलिब्रेटी मंडळीदेखील सामील झाले आहेत. बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेइंडस्ट्री, सेलिब्रेटींनी देखील त्यांच्या बालपणींचे फोटो शेअर करताना दिसतात आणि आपल्या आठवणींना उजाळा देताना दिसतात. दरम्यान मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा बालपणीचा सोशल मीडियावर व्हायरल होतोय. फोटोत आईच्या कडेवर असलेली  ही क्युट अभिनेत्री आज मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून तेजश्री प्रधान आहे. तेजश्री या फोटोत आईच्या कडेवर आहे. फोटो तेजश्रीचे बाबासुद्धा आहेत. आई-बाबांसोबत फोटो काढताना कॅमेऱ्याकडे बघून क्युट स्माईल देताना दिसतेय. काही दिवसांपूर्वीच तेजश्रीच्या आईचं निधनं झालं. 

तेजश्री सध्या स्टार प्रवाहवरील  'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत झळकते आहे. मालिकेत तेजश्री मुक्ता ही भूमिका साकारत आहे.तेजश्रीने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर अधिराज्य गाजविले आहे. होणार सून मी या घरची या मालिकेत जान्हवीच्या भूमिकेतून ती घराघरात पोहचली. त्यानंतर अग्गंबाई सासूबाई मालिकेच्या पहिल्या पर्वात शुभ्राने तिच्या लोकप्रियतेत भरच घातली आहे.  'जजमेंट', 'ती सध्या काय करते', 'झेंडा' अशा कितीतरी मालिका, सिनेमांमध्ये ती झळकली आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकार