Join us

चिंता नको, टीम इंडिया आम्ही तुमच्यासोबत आहोत - अमिताभ बच्चन

By admin | Updated: March 16, 2016 12:20 IST

पराभवामुळे टीम इंडियावर चहूबाजूंनी टीका होत असताना बॉलिवूडचे शेहनशहा अमिताभ बच्चन मात्र टीम इंडियाच्या पाठिशी उभे राहिले आहेत.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १६ - आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत सलामीच्याच सामन्यात झालेल्या दारुण पराभवामुळे टीम इंडियावर चहूबाजूंनी टीका होत असताना बॉलिवूडचे शेहनशहा अमिताभ बच्चन मात्र टीम इंडियाच्या पाठिशी उभे राहिले आहेत. 
 
सोशल मिडीयावर सक्रीय असणा-या अमिताभ यांनी टीम इंडियाचे समर्थन केले आहे. आपल्या टी-२० संघाला पराभवामुळे धक्का बसला आहे. पण आमचा तुमच्यावर विश्वास आहे. टीम इंडिया चिंता करु नका आम्ही तुमच्यासोबत आहोत असा संघाचा हुरुप वाढवणारा संदेश बच्चन यांनी टि्वटरवरुन दिला आहे. 
 
सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर ४७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. माफक १२७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव अवघ्या ७९ धावांमध्ये आटोपला. 
 
 
 
{{{{twitter_post_id####}}}}