Join us
Daily Top 2Weekly Top 5

रमजानमध्ये असे कपडे घालू नको, दंगल गर्लला नेटीझन्सने सुनावले

By admin | Updated: June 8, 2017 14:52 IST

फातिमाने हे फोटो जीक्यू इंडियाच्या जून एडिशनसाठी शूट केले आहेत. मात्र बिकीनीमधील तिचे फोटो काहींना आवडले नाहीत.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 8 - दंगल गर्ल फातिमा सना शेख हिने नुकतेच एक फोटोशूट केले आहे. तिचा नवा आवतार पाहून सर्व जण दंग राहिले आहेत. फातिमाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही बिकिनी फोटो शेअर केले आहेत. काळ्या रंगाच्या स्विमसूटमध्ये फातिमा खूपच हॉट दिसत आहे. फातिमाने हे फोटो जीक्यू इंडियाच्या जून एडिशनसाठी शूट केले आहेत. मात्र बिकीनीमधील तिचे फोटो काहींना आवडले नाहीत. अनेकांनी तिला रमझानमध्ये असे कपडे न घालण्याचा सल्लाही दिला. काही नेटिझन्सनी तिला बेशर्मही म्हटले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. खरं तर फातिमा नेहमीच तिचे फोटो इन्स्टावर शेअर करीत असते. आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणा-या फातिमाचे इन्स्टावरील फोटोज नेहमीच चर्चेत राहिले आहेत. परंतु यावेळेस तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये खूपच बोल्डनेस असल्याने ती सध्या सोशल मीडियावर चर्चिली जात आहे. या अगोदरदेखील फातिमाने फेमिना साप्ताहिकासाठी फोटोशूट केले होते. या फोटोशूटमध्ये तिला नवरीच्या रूपात दाखविण्यात आले होते. तिचे हे फोटो त्यावेळी खूपच पसंत केले गेले.

दंगलच्या यशानंतर फातिमा सध्या आमीरच्याच ठग्स आॅफ हिंदोस्तान या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. या चित्रपटात आमीर आणि फातिमा व्यतिरिक्त महानायक अमिताभ बच्चन आणि कॅटरिना कैफ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाला विजय कृष्णा आचार्य हे दिग्दर्शित करीत आहेत. या चित्रपटाविषयी सध्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. पुढच्या महिन्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली जाणार आहे. खरं तर ठग्स आॅफ हिंदोस्तान या चित्रपटाची रिलीज डेट अद्यापपर्यंत निश्चित केलेली नाही; मात्र असे म्हटले जात आहे की, हा चित्रपट दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रिलीज केला जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाविषयी दररोज वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. हा चित्रपट पायरेट्स आॅफ कॅरेबियन या चित्रपटावर आधारित असल्याचे बोलले जात आहे. नुकतेच चित्रपटाच्या सेटचे फोटो समोर आले असून, त्यात पायरेट्स आॅफ केरिबियनया हॉलिवूडपटाची झलक बघावयास मिळत आहे.