Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीपिकाचे कुटुंबियांसोबत दिवाळी सेलिबे्रशन

By admin | Updated: October 30, 2016 01:14 IST

दि वाळी सुरू झाली आणि सगळीकडे सेलिब्रेशनचा मूड तयार झाला. सेलिब्रेटिंमध्येसुद्धा दिवाळीचा उत्साह जोमात दिसून येतोय. बॉलीवूडमधील अनेक कलाकार दिवाळीमध्ये

दि वाळी सुरू झाली आणि सगळीकडे सेलिब्रेशनचा मूड तयार झाला. सेलिब्रेटिंमध्येसुद्धा दिवाळीचा उत्साह जोमात दिसून येतोय. बॉलीवूडमधील अनेक कलाकार दिवाळीमध्ये कामातून सुटी घेऊन आपल्या कुटुंबासोबत सण साजरा करण्याची प्लॅनिंग करीत आहेत. दीपिकासुद्धा दिवाळीसाठी तिच्या घरी बंगळुरूला जाणार आहे. तेथे फॅमिलीसोबत ती दिवाळी साजरी करणार आहे. ती सांगते, ‘लहानपणापासून मला दिवाळी हा सण खूप आवडतो. शाळेत असताना तर दिवाळ्ीच्या सुट्यांची मी आवर्जुन वाट पाहत असे. यंदा संपूर्ण कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवण्यासाठी मी बंगळुरूला जातेय.’एक रंजक गोष्ट म्हणजे तिच्या घरामध्ये सर्वांची नावे ही दिवाळीशी निगडित आहेत. ‘दीपिका’, वडिल ‘प्रकाश’, आई ‘उजाला’ आणि बहीण ‘अनुषा’ अशी नावे आहेत. दिवाळी सेलिब्रेशननंतर दीपिका संजय लीला भंसाळीच्या ‘पद्मावती’च्या तयारीला लागणार आहे.