Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिव्या खोसलाच्या या गाण्याला 4 दिवसांत 72 लाख व्ह्यूज

By admin | Updated: February 1, 2017 15:04 IST

गाण्याला मिळालेले अभुतपूर्व यश आणि व्हिडीयोमध्ये दाखवलेले आई व मुलगा यांच्या नात्याचे बंध साजरे करण्यासाठी 2 फेब्रुवारी रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

दिव्या खोसला कुमारचे कभी यादोंमे हे नवीन गाणं रीलिज झालं असून 2017मधल्या धडाकेबाज प्रतिसाद मिळालेल्या गाण्यांमध्ये त्यानं स्थान मिळवलं आहे. हे गाणं रीलिज झाल्यानंतर अवघ्या 4 दिवसांमध्ये तब्बल 72 लाख जणांनी हे गाणं यु ट्यूबवर बघितलं आहे. या गाण्याला मिळालेले अभुतपूर्व यश आणि व्हिडीयोमध्ये दाखवलेले आई व मुलगा यांच्या नात्याचे बंध साजरे करण्यासाठी 2 फेब्रुवारी रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दिव्या खोसला कुमारबरोबरच सदाबहार अभिनेत्री श्रीदेवी यावेळी उपस्थित राहणार आहेत. दिव्या व भूषण कुमार यांचे अत्यंत जवळचे मित्र असलेले बोनी कपूर आणि श्रीदेवी प्रथमदर्शनीच या गाण्याच्या प्रेमात पडले. दिव्याच्या जबरदस्त अशा परफॉर्मन्सचे त्यांनी भरपूर कोतूक केले आहे. या दोन महान कलाकारांना एकत्र आणणारा हा कार्यक्रम कधी एकदा बघतो अशी उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.