बॉक्स ऑफिसवर जेव्हा दोन मोठे चित्रपट आमनेसामने येतात, तेव्हा चित्रपटसृष्टीत मोठी चर्चा असते. पुढच्या काहीच दिवसांमध्ये अभिनेता यशचा 'टॉक्सिक' (Toxic) आणि आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २' (Dhurandhar 2) यांच्यात मोठी टक्कर पाहायला मिळणार आहे. याविषय बॉलिवूडचे 'काबील' दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी त्यांची टिप्पणी दर्शवली आहे. काय म्हणाले संजय गुप्ता?
'धुरंधर २' आणि 'टॉक्सिक' यांच्यात होणाऱ्या बॉक्स ऑफिस टक्करवर भाष्य करताना दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी सांगितले की, ते हे दोन्ही चित्रपट पाहणार आहेत, परंतु हे दोन्ही चित्रपट अपेक्षित बॉक्स ऑफिस कलेक्शन करु शकणार नाहीत. ते पुढे म्हणाले, "मी दोन्ही चित्रपट नक्कीच बघेन, पण दुर्दैवाने हे दोन्ही एकाच वेळी प्रदर्शित होत आहेत. या दोन्ही सिनेमांची प्रेक्षक खूप आतुरतेने वाट पाहत आहेत आणि अशा वेळी एकत्र आल्यामुळे ते फक्त एकमेकांच्या कमाईवर परिणाम करतील."
या संदर्भात बोलताना त्यांनी २०१७ मध्ये आपला चित्रपट 'काबिल' आणि शाहरुख खानचा 'रईस' यांच्यात झालेल्या क्लॅशची आठवण काढली. ते म्हणाले की, ''जर त्यावेळी ते दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या वेळी प्रदर्शित झाले असते, तर दोघांनाही मोठा फायदा झाला असता. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण काही खूप श्रीमंत देश नाही आणि आपल्या लोकांकडे दोन्ही चित्रपट पाहण्यासाठी एवढा पैसा नाही. असे अनेक लोक आहेत जे एका महिन्यात दोन चित्रपट पाहू शकत नाहीत.'', त्यामुळेच संजय गुप्ता यांनी या क्लॅशला 'अनावश्यक' म्हटले आहे.
Web Summary : Sanjay Gupta predicts 'Dhurandhar 2' and 'Toxic' clash will hurt both films' earnings. He recalls his own film 'Kaabil' clashing with 'Raees', emphasizing the financial strain on audiences to watch multiple movies close together, deeming such clashes 'unnecessary'.
Web Summary : संजय गुप्ता ने भविष्यवाणी की है कि 'धुरंधर 2' और 'टॉक्सिक' का टकराव दोनों फिल्मों की कमाई को नुकसान पहुंचाएगा। उन्होंने अपनी फिल्म 'काबिल' का 'रईस' से टकराव याद किया, और दर्शकों पर एक साथ कई फिल्में देखने के वित्तीय दबाव पर जोर दिया, और ऐसे टकराव को 'अनावश्यक' बताया।