Join us

दिग्दर्शकाने या अभिनेत्रीकडे एक रात्र काढण्याची केली होती मागणी

By admin | Updated: September 18, 2016 08:59 IST

अभिनेत्री सुर्विन चावलाने आपल्या स्ट्रगलच्या काळातील एक सनसनाटी खुलासा केला आहे. 'हेट स्टोरी २' मध्ये इंटीमेट सीन्स केलेल्या सुर्विनला एका दिग्दर्शकाने आपल्या सोबत रात्र काढण्याची मागणी केली होती.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १८ : अभिनेत्री सुर्विन चावलाने आपल्या स्ट्रगलच्या काळातील एक सनसनाटी खुलासा केला आहे. 'हेट स्टोरी २' मध्ये इंटीमेट सीन्स केलेल्या सुर्विनला एका दिग्दर्शकाने आपल्या सोबत रात्र काढण्याची मागणी केली होती. ती कास्टींग काऊचची शिकार झाली होती. मात्र हा प्रकार तमिळ फिल्मसाठी घडल्याचे तिने सांगितले. सध्या सुरवीन चावला अजय देवगण निर्मित आणि लीना यादव हिच्या 'पार्श' चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये सुर्विनची महत्वाची भूमिका आहे. प्रमोशनसाठी आलेल्या सुर्विनने कास्टींग काऊच झाल्याचा खुलासा केला. आयुष्यातील काही कटू सत्याचा उलगडा तिने यावेळी केला. दिग्दर्शकाने तिला कसे जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता त्याचाही खुलासा तिने केला.तमिळ चित्रपटासाठी तिने ऑडिशन दिली होती. त्यानंतर तिची निवडही करण्यात आली. चित्रपट मोठा असल्यामुळे सुर्विन खूश झाली. दिग्दर्शकाला हिंदी बोलता येत नव्हते. आपल्यासोबत रुममध्ये राहण्यास येण्याचा निरोप त्याने आपल्या मित्राकडून पाठवला होता.जर तिला या चित्रपटात काम करायचे असेल तर दिग्दर्शकासोबत रुममध्ये एकत्र राहणे आवश्यक असल्याचे त्याच्या मित्राने सांगितले. असे जर केले नाही तर चित्रपटात भूमिका मिळणार नसल्याचे तो म्हणाला. असली ऑफर धुडकावून लावल्याचे सुर्विनने सांगितले. तिची स्क्रिनवर ज्याप्रकारची प्रतिमा तयार झाली आहे त्यामुळे लोकांना हे सोपे असल्याचे वाटते. 'हेट स्टोरी २' मध्ये भूमिका केल्यापासून तिला अनेक बोल्ड आणि सेक्सी भूमिकांसाठी ऑफर येत असल्याचेही सुर्विन म्हणाली.