Join us  

दिशा पटानी आणि टायगर श्रॉफच्या नात्यात "या" अभिनेत्रीमुळे दुरावा?

By admin | Published: May 23, 2017 10:12 PM

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी यांच्या नात्याची चर्चा सर्वश्रूत आहे. बॉलिवूडच्या या हॉट जोडीला नेहमी

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी यांच्या नात्याची चर्चा सर्वश्रूत आहे. बॉलिवूडच्या या हॉट जोडीला नेहमी एकत्र पाहिलं गेलंय तर सुट्ट्यांमध्येही दोघं एकत्रच फिरायला जातात. मात्र दोघांच्या नात्यात तिस-या व्यक्तीने एन्ट्री केल्याची चर्चा आहे.
 
स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, टायगर आणि दिशामध्ये निधी अग्रवाल या नवख्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. निधी अग्रवाल आणि टायगर आगामी सिनेमा "मुन्ना मायकल"मध्ये एकत्र दिसणार आहेत. निधी आणि टायगरमध्ये जवळीक निर्माण झाल्याची चर्चा आहे. 
 
निधी "मुन्ना मायकल"मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. टायगर आणि तिच्यात चांगली मैत्री झाल्याचं बोललं जात आहे. पण दोघांची मैत्री दिशा पटानीला आवडलेली दिसत नाही. टायगर आणि निधी आउटडोर शूटींगसाठी असतात त्यावेळी दिशा पटानी तेथे न बोलवताही पोहोचते असं स्पॉटबॉयने म्हटलं आहे. निधीमुळे दिशा आणि टायगरमध्ये खटके उडत असल्याचं स्पॉटबॉयने वृत्त दिलं आहे.