Join us

लग्नानंतर डिंपल गर्लचा संदेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2016 07:01 IST

‘डिंपल गर्ल’ प्रीती झिंटा हिने नुकतेच यूएसच्या फायनान्शियल कन्सल्टंट जेने गुडनगसोबत येथे लग्न केले. तिच्या बॉलीवूडमधील काही मित्र-मैत्रिणींनी तिला लग्नानंतर विश केले आहे.

‘डिंपल गर्ल’ प्रीती झिंटा हिने नुकतेच यूएसच्या फायनान्शियल कन्सल्टंट जेने गुडनगसोबत येथे लग्न केले. तिच्या बॉलीवूडमधील काही मित्र-मैत्रिणींनी तिला लग्नानंतर विश केले आहे. ‘आमचे लग्न सिक्रेटली ठरलेलेच होते,’ असे ती आता सर्वांना सांगते आहे. तिने फेसबुकवर चाहत्यांसाठी एक मेसेज पोस्ट केला आहे. ती म्हणते, ‘मी आत्तापर्यंत ‘मिस टॅग’ सांभाळला, मला गुडनग नावाचा कोणीतरी भेटला आणि त्याला हा टॅग देऊन टाकण्यासाठी मी आत्तापर्यंत प्रयत्न करत होते. आता मी मॅरिड क्लब फोक्स जॉइन करणार आहे. सर्वांना थँक यू. लव्ह यू आॅल टिंग! लेट्स द गुडनग जोक्स बिगिन.’ प्रिती स्वत:देखील तिच्या लग्नानंतरच्या आडनावावर जोक ऐकण्यासाठी तयार आहे.