Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिलजीत दोसांझने लंडनमध्ये प्यायली सर्वात महागडी कॉफी, किंमत जाणून धक्का बसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 16:50 IST

दिलजीत दोसांझ सध्या लंडन ट्रीपवर आहे, तिथून एक मजेदार व्हिडीओ त्याने शेअर केला आहे.

जगभरात चहाप्रेमी (Tea) प्रमाणेच कॉफी (Coffee) प्रेमींची संख्याही फार मोठी आहे. अनेकजण कॉफीचे शौकीन असतात. कॉफीच्या (Coffee) नवनव्या स्वादाच्या शोधात ते बरीच ठिकाणं पालथी घालत असतात. प्रत्येक ठिकाणच्या कॉफीची चव आणि किंमतही वेगवेगळी असते. अशीच एका महागडी कॉफी प्यायली आहे पंजाबी गायक आणि सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता दिलजीत दोसांझनं (Diljit Dosanjh). ही कॉफी विकत घेण्याऐवजी तुम्हाला एखादा नवा कोरा फोन खरेदी करता येईल, कारण याची किंमत खूप जास्त आहे.

दिलजीत दोसांझ सध्या लंडन ट्रीपवर आहे, तिथून एक मजेदार व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिलजीतने लंडनमधील सर्वात महागडी कॉफी पिण्याचा अनुभव शेअर केला आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओला त्याने "लंडनची सर्वात महागडी कॉफी" असं कॅप्शन दिलं आहे.

दिलजीतनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसतं की तो एका लक्झरी कॅफेमध्ये जपान टायपिका नावाची कॉफी ऑर्डर करतो. कॉफीची किंमत पाहून थक्क होतो. तो म्हणतो, "अरे बापरे, ही तर खूप महाग आहे. भारतात एवढ्या पैशांत लग्न होतं!". या व्हिडीओमध्ये त्यानं कॉफी बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया आणि ती कशी सर्व्ह केली जाते हेही दाखवलं. यावेळी तो पंजाबीमध्ये म्हणतो,"इतके पैसे घेऊनही ते कॉफीमध्ये सर्वकाही मोजून मापून घालत आहेत. मी आता काहीतरी शुद्ध पिणार आहे. मी आज जेवणार नाही, मी फक्त हेच पिईन, ते खूप महाग आहे. प्रत्येक घोटाची किंमत ७ हजार रुपये आहे".

ही महागडी ही कॉफी प्यायल्यानंतर  दिलजीत त्याच्या मित्रांना म्हणतो "हे काहीतरी वेगळं वाटतंय का?". त्याला ती फिकी वाटते.  तर दिलजीतनं प्यायलेल्या या कॉफीची किंमत तब्बल ३१,००० हजार आहे. दिलजीतचा हा लक्झरी कॉफी अनुभव सध्या सोशल मीडियावर चर्चेत ठरला आहे.

टॅग्स :दिलजीत दोसांझसेलिब्रिटीबॉलिवूड