Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बॉर्डर २'चं शूट संपवून दिलजीत दोसांझ पुन्हा 'नो एन्ट्री'त? स्क्रिप्टवरुन दिला होता नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 12:00 IST

दिलजीत दोसांझने क्रिएटिव्ह डिफ्रन्समुळे 'नो एन्ट्री २' सोडला अशी अनेक महिन्यांपासून चर्चा होती.

बॉलिवूडमध्ये अनेक सीक्वेल्स बनत आहेत. त्यातच एका सीक्वेलची चर्चा आहे. तो म्हणजे 'नो एन्ट्री २'.  वरुण धवन आणि अर्जुन कपूर या सीक्वेलमध्ये असणार आहेत. तर तिसरा अभिनेता म्हणून दिलजीत दोसांझच्या (Diljit Dosanjh)  नावावर शिक्कामोर्तब झालं  आहे. काही दिवसांपूर्वी दिलजीतने स्क्रिप्ट आवडली नसल्याचं सांगत सिनेमातून काढता पाय घेतला होता. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. मात्र आता दिलजीत 'नो एंट्री २' (No Entry 2) मध्ये परत आला असल्याची अपडेट समोर आली आहे.

दिलजीत दोसांझने क्रिएटिव्ह डिफ्रन्समुळे 'नो एन्ट्री २' सोडला अशी अनेक महिन्यांपासून चर्चा होती. नंतर दिलजीतच्या तारखा जुळत नसल्याचं कारण समोर आलं होतं. दिलजीत गेल्या काही दिवसांपासून 'बॉर्डर २' सिनेमाच्या शूटमध्येही व्यग्र होता. दरम्यान पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबतच्या सिनेमाचं प्रमोशन केल्याने त्याच्यावर टीका झाली. त्याला 'बॉर्डर २'मधून बाहेर काढण्याचीही मागणी झाली. दिलजीत 'बॉर्डर २'मधून बाहेर पडल्याचंही बोललं गेलं. मात्र तसं झालं नव्हतं. काही दिवसांपूर्वीच सिनेमातील त्याच्या पार्टचं शूट संपलं. सिनेमाच्या टीमसोबत त्याचा शेवटचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. 

मीडिया रिपोर्टनुसार, 'नो एन्ट्री २' सिनेमा ट्रॅकवर आहे. ऑक्टोबरनंतर सिनेमाचं शूट सुरु होणार आहे. एक महिन्याचं शूटिंग शेड्युल असणार आहे. सिनेमा भारताबाहेर इटली आणि ग्रीसमध्येही शूट होणार आहे. सिनेमाची कथा पहिल्या पार्टपेक्षा काहीशी वेगळी असणार आहे. तरी यातही तीन पुरुष, त्यांच्या पत्नी आणि तीन एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरभोवती ही कथा फिरणार आहे. हा नो एन्ट्रीचा स्पिरिचुअल सीक्वेल असेल. निर्माते बोनी कपूर कलाकारांच्या तारखा जुळवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तर अनीस बज्मी यांनी स्क्रिप्ट पूर्ण केली आहे. लवकरच सिनेमाची अधिकृत घोषणाही होणार आहे.

टॅग्स :दिलजीत दोसांझबोनी कपूरबॉलिवूड