Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिंग इज किंग! कंगनाच्या गंभीर आरोपावर दिलजीतने दिलं उत्तर, गायक म्हणाला - थोडी तरी लाज वाटू दे....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 09:19 IST

दिलजीत आणि प्रियांका चोप्रावर कंगनाने ट्विटमधून निशाणा साधला होता. कंगनाने दिलजीतवर शेतकऱ्यांना भडकवण्याचा आरोप  लावला होता. यावर आता दिलजीतने उत्तर दिलं आहे.

कंगना रणौत आणि दिलजीत दोसांज यांच्यातील ट्विटर वॉर कमी झालं असलं करी संपलेलं अजिबात नाहीये. शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या दिलजीत आणि प्रियांका चोप्रावर कंगनाने ट्विटमधून निशाणा साधला होता. कंगनाने दिलजीतवर शेतकऱ्यांना भडकवण्याचा आरोप  लावला होता. यावर आता दिलजीतने उत्तर दिलं आहे.

कंगनाने ट्विट केलं होतं की, 'माझी इच्छा आहे की, दिलजीत दोसांज आणि प्रियांका चोप्राजी जे शेतकऱ्यांसाठी लोकल क्रातिकारकांच्या रूपात दिसले. त्यांनी कमीत कमी एका व्हिडीओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे सांगावं की, त्यांना विरोध कशाचा करायचा आहे. दोघेही शेतकऱ्यांना भडकावून गायब झाले आणि आता शेतकऱ्यांनी आणि देशाची ही स्थिती आहे'.

यावर दिलजीतने पंजाबी भाषेत कंगनाला उत्तर दिलंय. दिलजीतने लिहिले की, 'गायब होण्याचं जाऊदे....पण तुला हे ठरवण्याचा अधिकार कुणी दिला की, कोण देशद्रोही आहेत आणि कोण देशभक्त आहेत? हा अधिकार आला कुठून? शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवण्याआधी कमीत कमी लाज वाटली पाहिजे'.

याआधी कंगनाने प्रियांका आणि दिलजीतला टॅग करत ट्विट लिहिले होते की, 'शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी येणार खर्च ७० हजार कोटी आहे. आंदोलनामुळे इंडस्ट्री आणि छोट्या फॅक्टऱ्यांची इकॉनॉमी संथ झाली आहे. याने दंगे भडकू शकतात. दिलजीत आणि प्रियांका तुम्हाला समजतंय ना....आपल्या अॅक्शनचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. प्लीज मला सांगा..कोण याची भरपाई करेल?'. 

टॅग्स :दिलजीत दोसांझकंगना राणौत