टीव्हीवर प्रसारित केल्या जाणाऱ्या ‘रिआॅलिटी शो’ च्या माध्यमातून बॉलिवूड व टीव्ही इंडस्ट्रीला अनेक कलावंत दिले आहेत. देशातील सिंगिंग टॅलेंट शोधून क ाढणारा एक नवा रिअॅलिटी सिगिंग शो कलर्स वाहिनीवर सुरू होत आहे. आतापर्यंत प्रसारित झालेल्या रिअॅलिटी शोच्या तुलनेत रायजिंग स्टार नव्या युगाचा शो ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रसिद्ध संगीतकार शंकर महादेवन, गायिका मोनाली ठाकूर व बॉलिवूड स्टार व गायक दलजीत दोसांझ रायझिंग स्टारमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना जज करणार आहेत. आतापर्यंत टीव्हीवर प्रसारित होत असलेल्या कार्यक्रमांपेक्षा वेगळा असणारा रायझिंग स्टार हा लाईव्ह रिअॅलिटी शो असणार आहे. जे होत आहे तेच टीव्हीवर दर्शकांना पाहता येणार आहे. यात कोणतीही गोष्ट स्क्रिप्टेड नसेल हे विशेष. या शोमध्ये केवळ तज्ज्ञ जजेस स्पर्धकांचे परीक्षण करणार आहेत, मात्र प्रथमच स्पर्धकांचा परफॉर्मन्सवर कलर्स टीव्ही अॅपच्या माध्यमातून प्रेक्षकांना आपली मते नोंदविता येणार आहेत. यामुळे प्रेक्षक स्पर्धकांच्या परफॉर्मन्सवर लगेच मतदान करू शकणार आहेत. प्रेक्षकांचे मतदान त्या स्पर्धकांचे या कार्यक्रमातील वाटचलीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही जजेस आपआपल्या क्षेत्रातील विशेषज्ज्ञ आहेत. तरी देखील प्रेक्षकांचे मतदान महत्त्वाचे ठरणार आहे. डिजीटल इंडियाचा नवा रायझिंग स्टार निवडण्यासाठी प्रेक्षकांची ७० टक्के पसंती त्या स्पर्धकाला मिळायला हवी. यामुळे स्पर्धकाचे भाग्य प्रेक्षकांच्या वोटिंगवर अवलंबून राहणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यास संपूर्ण देशातून स्पर्धक आले असून त्याचे परफॉर्मन्स थक्क करणारे ठरणार आहेत. पाहा कलर्स चॅनलवर ४ फे ब्रुवारीपासून दर शनिवारी व रविवारी रात्री ९ वाजता ‘रायजिंग स्टार’ आणि निवडा डिजीटल इंडियाचा पहिला रायजिंग टॅलेंटेड स्टार.
कलर्सवर प्रेक्षकांना निवडता येणार डिजीटल इंडियाचा ‘रायजिंग स्टार’
By admin | Updated: February 4, 2017 03:16 IST