Join us
Daily Top 2Weekly Top 5

'स्मोक'मधून पाहायला मिळणार गोव्यातील वास्तव - कल्की कोचलिन

By तेजल गावडे | Updated: October 26, 2018 18:14 IST

अभिनेत्री कल्की कोचलिन इरॉस नाऊच्या 'स्मोक' वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. या वेबसीरिजमध्ये ती डीजे प्लेयरच्या भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेत्री कल्की कोचलिन इरॉस नाऊच्या 'स्मोक' वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. या वेबसीरिजमध्ये ती डीजे प्लेयरच्या भूमिकेत दिसणार आहे. या वेबसीरिजच्या निमित्ताने तिच्याशी केलेली ही बातचीत...

- तेजल गावडे

'स्मोक' या वेबसीरिज व तुझ्या भूमिकेबद्दल सांग?गोवा माफियावर स्मोक ही वेबसीरिज भाष्य करते. मी अशापद्धतीचा गोवा याआधी कधी पाहिला नव्हता. आपण गोव्याकडे हॉलिडे स्पॉ़ट व मजामस्ती करण्याचे ठिकाण मानतो.पण या वेबसीरिजच्या माध्यमातून तुम्हाला गोव्याची वेगळी बाजूदेखील पाहता येणार आहे. गोव्यातील वास्तव तुम्हाला पाहायला मिळणार आहे. नक्कीच तिथे सुट्ट्या व्यतित करता येतात. पार्टी व मौजमज्जा करता येते पण एक काळी बाजूदेखील आहे ती म्हणजे माफिया. माफीया, एण्टरटेन्मेंट इंडस्ट्री, क्लब, म्युझिक याचबरोबर राजकीय नेते, राजकीय व्यवस्था अशा सर्व गोष्टी यात दाखवण्यात आल्या आहेत. मी यात तारा नामक डीजे प्लेयरची भूमिका साकारली आहे. ती पोर्तुगलवरून डीजेसाठी गोव्यात येते व तिथे ती माफियांमध्ये येऊन फसते. तिची प्रेमकथा देखील यात पाहायला मिळणार आहे.

डीजे प्लेयरची भूमिका तू पहिल्यांदाच करते आहेस, तर या भूमिकेची तयारी काय केलीस?तारा ही पोर्तुगलवरून आलेली आहे. तिच्या हिंदी व इंग्रजी भाषेत पोर्तुगीझ अॅक्सेंट आहे. त्यामुळे सेटवर अॅना म्हणून एक पोर्तुगीझ कलाकार होती. तिने मला पोर्तुगीझ भाषा शिकवली. डीजेसाठी मला दिग्दर्शकाने एका डीजेसाठी रेफंरस दिला होता. अॅलीसन वंडरलँड खूप लोकप्रिय डीजे आहे. तिची स्टाईल व तिच्या म्युझिकची स्टाईल मी जाणून घेतली. अशा दोन गोष्टी मी या भूमिकेसाठी जाणून घेतल्या.

'स्मोक' या वेबसीरिजच्या चित्रीकरणाचा तुझा अनुभव कसा होता?खूप चांगला अनुभव होता. गोव्यात चित्रीकरण झाले. तर खूप चांगले ठिकाण आहे. आम्ही बरेचशे चित्रीकरण रात्रीचेही केले आहे. दुपारी आम्ही उठायचो आणि बीचवर जाऊन स्विमिंग करून मग कामाला सुरूवात करायचो. पूर्ण रात्रभर चित्रीकरण करायचो. सकाळी बीचवर जेवण करायचो आणि मग, झोपायचो. असा  आमचा दिनक्रम होता. या शूटमध्ये माझे बरेचसे मित्र होते. गुलशन देवैया, नील भूपलम आणि जिम सरब यांच्यासोबत मी यापूर्वी देखील बरेच काम केले आहे. ते देखील या वेबसीरिजमध्ये होते. त्यामुळे खूप मजा आली. 

तुझा आगामी चित्रपट 'गल्ली बॉय'मधील तुझ्या भूमिकेबद्दल सांग ?गल्ली बॉय चित्रपट ज्याचे दिग्दर्शन झोया अख्तरने केले आहे. या चित्रपटात आलिया भट व रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. यात मी म्युझिक प्रोड्युसरची भूमिका साकारली आहे. ती रणवीर सिंगला डिस्कव्हर करते. जो साँग रॅपर व गीतकार आहे. जो धारावीच्या मधून असून तो खूप टॅलेंटेड आहे. त्याच्यासोबत मी एक गाणे करताना चित्रपटात दिसणार आहे. 

'स्मोक'नंतर तू आणखीन एका वेबसीरिजमध्ये दिसणार आहेस, त्याबद्दल काय सांगशील?हो. 'स्मोक'नंतर मी 'मेड इन हेवन' या वेबसीरिजमध्ये काम केले आहे. ही वेबसीरिज दिल्लीतील एका श्रीमंत घरातील लग्नावर भाष्य करते. ही वेबसीरिज अॅमेझॉन प्राईमवर पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :कल्की कोचलीन