Join us

भिकाऱ्याच्या गेटअपमधील 'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलं का? बिग बी, आलिया भट्टसोबत केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 15:35 IST

Marathi actress: या अभिनेत्रीने गंगुबाई काठियावाडी, न्यूड, झुंड यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

सध्याच्या काळात सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे कलाकार मंडळी या माध्यमातून थेट चाहत्यांशी जोडले जातात. अनेक कलाकार सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय आहेत. त्यामुळे ते कायम त्यांच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्याचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असतात. तर, काही वेळा ते त्यांच्या जुन्या आठवणींनाही उजाळा देतात.सध्या सोशल मीडियावर अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर मराठी कलाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे. या अभिनेत्रीने मराठीसह बॉलिवूडमध्येही अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहेत. अलिकडेच ती आलिया भट्टच्या गंगुबाई काठियावाडी या सिनेमात झळकली होती.विशेष म्हणजे तिचा अभिनय पाहून प्रेक्षक तर भारावून जातातच. मात्र, तिच्या अभिनयाची दखल चक्क बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांनीही घेतली आहे.

'सैराट'फेम अभिनेत्रीने इंडस्ट्रीत सांगितलं होतं तिचं खोटं वय; चूक समजली अन्..

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एक भिकारी महिला रस्त्यावर बसून आक्रोश करत आहे. हा फोटो पाहिल्यावर ती भूकेने व्याकूळ झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे फोटोत दिसणारी ही भिकारी महिला दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री छाया कदम आहे. छाया यांनी या भूमिकेला उत्तम न्याय दिला असून त्यांच्या बदललेल्या लूकमुळे त्यांना ओळखणंही कठीण झालं आहे.

दरम्यान, छाया कदम यांनी शेअर केलेला हा फोटो 'बाबू बँडबाजा' या २०११ साली रिलीज झालेल्या सिनेमातील आहे.  'सैराट', 'फँड्री', 'न्यूड', 'हलाल', 'केसरी', 'गंगुबाई काठियावाडी' अशा कितीतरी गाजलेल्या हिंदी, मराठी सिनेमांमध्ये काम करत त्यांनी त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

टॅग्स :सिनेमासेलिब्रिटीअमिताभ बच्चनआलिया भट