Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोण होतीस तू?, काय झालीस तू? या फोटोमधील अभिनेत्रीला तुम्ही ओळखलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 13:22 IST

'बिग बॉसच्या 5' व्या सिझनमध्ये ती सहभागी झाली होती. याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाशझोतात आली होती.

ही बेबी डॉल आहे नखरेवाली... सध्या चोहीकडे सनीच्या हॉट अदांच्या चर्चा.... तिच्या याच सेक्सी अदा आणि नख-यांवर सारेच फिदा...तिचा बोल्ड लूक आणि बिनधास्त अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल...ऑन एंड ऑफ स्क्रीन बोल्ड लूकमुळे चर्चेत असणारी सनी प्रत्यक्ष जीवनातही बिनधास्त आणि रोखठोक आहे. एकूणच काय ही सध्या बॉलीवुड आणि फॅन्समध्ये फक्त सनी लिओनीची हवा आहे.  

तुर्तास मात्र हे काय सनीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. फोटोत ती सनीच आहे का हे ओळखणे कठिण असल्याचे पाहायला मिळतंय. अर्थात हा फोटो तिचा शूटिंगवेळचा आहे. मात्र असा मेकअप तिने कोणत्या प्रोजेक्टसाठी केला असावा याविषयी माहिती समोर आलेली नाही. मात्र तिचा हा भयावह असलेला लूक पाहून कोणीही दहा वेळ विचारात नाही पडला तरच नवल.  हॉट अदा आणि आयटम नंबर करणा-या सनीला आता काही तरी वेगळं करायचंय. कदाचित वेगळे काही करण्याच्या नादात सनी लिओनी आता पुढे काय करेन आणि काही नाही याचा विचार न केलेलाच बरा. 

भारतीय-कैनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पोर्नस्टार आहे.त्यानंतर सनीने 'जिस्म 2' बॉलिवूड पदार्पण केले होते. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते.बिग बॉसच्या 5 व्या सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती.याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाशझोतात आली होती. 

गेल्या काही दिवसांपासून सनी लिओनी सिनेमात झळकली नव्हती. 'करणजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी' यातच ती शेवटची बोल्ड लूकमध्ये पाहायला मिळाली. 'जिस्म 2', 'रागिनी एमएमएस 2' आणि 'जॅकपॉट' सारख्या सिनेमानंतर सनी आता पुन्हा एकदा धमाकेदार एंट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे.  एकता कपूरच्या कामसूत्र वेबसीरीजची ऑफर तिला मिळाली आहे.

'कामसूत्र' या पुस्तकावर ही  वेबसीरीज आधारित असणार आहे.  यानंतर तिला आणखी एक मोठा प्रोजेक्टम मिळाला आहे.तामिळ बायोपिकमध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. 'वीरमादेवी' नावाच्या योद्धावर हा सिनेमा बनणार आहे. या सिनेमात सनी विरमादेवीची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

टॅग्स :सनी लिओनी