Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठीमधील ‘डायलॉगबाजी’

By admin | Updated: November 1, 2015 02:15 IST

‘डायलॉग (संवाद)’ हा कुठल्याही चित्रपटाचा एक अविभाज्य घटक. एखादा चित्रपट जेवढा झपाट्याने लोकांपर्यंत पोहोचत नाही तेवढे डायलॉग प्रेक्षकांच्या मनाचा अचूक वेध घेतात.

‘डायलॉग (संवाद)’ हा कुठल्याही चित्रपटाचा एक अविभाज्य घटक. एखादा चित्रपट जेवढा झपाट्याने लोकांपर्यंत पोहोचत नाही तेवढे डायलॉग प्रेक्षकांच्या मनाचा अचूक वेध घेतात. हेच ‘डायलॉग’ चित्रपटाच्या यशाचे गमक ठरले असल्याची अनेक उदाहरणे चित्रपटसृष्टीमध्ये पाहायला मिळतील. उदाहरणार्थ, ‘शोले’ चित्रपट जसा चांगले कथानक, जय-वीरूचा दमदार अभिनय, सिनेमॅटोग्राफी यांसारख्या विविध गोष्टींसाठी स्मरणात राहिला, तसा ‘अरे ओ सांबा, कितने आदमी थे?’ किंवा ‘बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना’ यांसारख्या डायलॉगसाठीदेखील प्रेक्षकांनी या चित्रपटाची पारायणे केली. एवढेच नव्हे, तर अमरीश पुरी, प्रेम चोप्रा, शक्ती कपूर यांसारख्या खलनायकांपासून राजकुमार, अमिताभ बच्चन यांसारख्या नटांनी आपल्या जबरदस्त संवादफेकीमधून त्यांच्या चित्रपटांत जीव ओतण्याचे काम केले! पण, ही यादी हिंदीपुरतीच मर्यादित आहे असे नाही, तर मराठीमध्येही ‘डायलॉग’ची ही परंपरा अगदी निळू फुले, डॉ. श्रीराम लागू यांच्या चित्रपटांपासून ते स्वप्निल जोशीपर्यंत येऊन ठेपली आहे. मराठीमध्ये असेच काहीसे गाजलेले ‘डायलॉग’ सीएनएक्स वाचकांसाठी आम्ही येथे शेअर करीत आहोत. सुशीला- ‘बाई वाड्यावर या’सामना- ‘मारुती कांबळेचे काय झाले’हाच सूनबाईचा भाऊ- ‘ए सावित्रीबाई’अशी ही बनवाबनवी- ‘धनंजय माने इथेच राहतात का?’- ‘आणि या मिसेस बालगंधर्व’- ‘आणि हा माझा बायको’टाइमपास- अरे, हम गरीब हुए तो क्या हुआ? दिल से अमीर है, हम जियेंगे अपनी मर्जी से और तुमपर मरेंगे भी अपनी मर्जी से.. चले हवा आन दे.- आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले? आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार- आई-बाबा आणि साईबाबाची शप्पथ, अशीच पाहिजे आपल्याला..- मी शिकलो नाय, पण मला बोलता येते; तू शिकली पण तुला बोलता येत नाय.मी शिवाजीराव भोसले बोलतोय- लाज वाटते मराठी म्हणून जन्मल्याची- साला फुटक्या कवडीची किंमत नसलेला मी... मी मराठी माणूस- आम्ही खेकडे, आम्ही गांडूळ- अरे, पण खेकड्याला आज मासळी बाजारात किंमत आहे... गांडूळ खताला मागणी आहेदुनियादारी- मेहुणे मेहुणे मेव्हण्यांचे पाहुणे- सस्ती चिजोंका शॉक हम भी नहीं रखते- तुझी माझी यारी मग... गेली दुनियादारी- हातवळणे डॉक्टरांचा दवाखाना कुठे आहे... ताई- फक्त माझा आशीर्वाद घे आणि निघ.- हातात कॅडबरी असताना समोर आलेलं बिस्किटसुद्धा तुला सोडवत नाही... बच्चूच आहेस तू...- भाग भाग के आया और मौत को समोर पाया... ऐ रिशी पकूर- चांगल्या झाडावर नेहमीच माकडे चढतात...