Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणबीर बनणार ध्यानचंद

By admin | Updated: July 29, 2014 02:24 IST

सध्या बॉलीवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड आला आहे. बॉलीवूडच्या आघाडीचा अभिनेता-अभिनेत्रींकडे कोणत्या ना कोणत्या बायोपिकची आॅफर आलेली आहे.

सध्या बॉलीवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड आला आहे. बॉलीवूडच्या आघाडीचा अभिनेता-अभिनेत्रींकडे कोणत्या ना कोणत्या बायोपिकची आॅफर आलेली आहे. ‘भाग मिल्खा भाग’, ‘पानसिंह तोमर’सारखे बायोपिक बॉक्स आॅफिसवर यशस्वी ठरले आहेत, त्यामुळे हा ट्रेंड आता लोकप्रिय झाला आहे. अभिनेता रणबीर कपूरला हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांची भूमिका निभावण्याची आॅफर आल्याची बातमी आहे. स्क्रिप्ट रायटर बेदी दत्ता सध्या या चित्रपटाच्या कथेवर काम करीत आहे. या चित्रपटाची निर्मिती पूजा शेट्टी करणार आहेत. सर्वप्रथम शाहरुखशी संपर्क साधला होता; पण शाहरुखकडून होकार मिळाला नाही. आता रणबीरसाठी प्रयत्न केले जात आहेत.