Join us

'धोनी' आणि 'सरबजीत' ऑस्करच्या शर्यतीत

By admin | Updated: December 22, 2016 22:59 IST

ऑस्कर पुरस्कार मिळवण्यासाठीच्या सिनेमांच्या यादीमध्ये 'एम.एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी' आणि 'सरबजीत' या दोन भारतीय बायोपिक सिनेमांची निवड झाली आहे.

ऑनलाइन  लोकमत
मुंबई, दि. 22 - ऑस्कर पुरस्कार मिळवण्यासाठीच्या सिनेमांच्या यादीमध्ये 'एम.एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी' आणि 'सरबजीत' या दोन भारतीय बायोपिक सिनेमांची निवड झाली आहे. 'अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्स'ने ऑस्कर पुरस्कारासाठी दावेदार असलेल्या सर्वश्रेष्ठ सिनेमांची यादी बुधवारी जारी केली.  ऑस्करच्या अंतिम यादीत स्थान मिळवण्यासाठी संबंधित फीचर फिल्मचे खेळ लॉस अँजेलिसमधील व्यावसायिक थिएटरमध्ये 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या कालावधीत किमान सलग सात दिवस व्हायला हवेत. या सिनेमांचा कालावधी किमान 40 मिनिटांचा असणं आवश्यक आहे.
या दोन सिनेमांशिवाय भारतीय-अमेरिकन दिग्दर्शिका मीरा नायर यांच्या ‘क्वीन ऑफ कातवे’ ‘ला ला लँड’, ‘मूनलाईट’, ‘मँचेस्टर बाय द सी’, ‘सायलेन्स’, ‘अरायव्हल’, ‘डेडपूल’, ‘सुसाईड स्क्वॅड’, ‘कॅप्टन अमेरिका : सिव्हिल वॉर’, ‘एक्स मेन : अॅपॉकॅलिप्स’ यासारख्या  सिनेमांचाही समावेश आहे.