Join us

अमेरिकेत उपचारासाठी गेलेले धर्मेंद्र दिसले एकदम फिट, स्वत:च शेअर केला व्हिडिओ, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 16:30 IST

अमेरिकेत उपचारासाठी गेलेल्या धर्मेंद्र यांनी इन्स्टाग्रामवरुन त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

आपल्या अभिनयाने ७०-८०चं दशक गाजवणारे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. धर्मेंद्र यांची तब्येत बिघडल्याने ते मुलगा सनी देओलबरोबर अमेरिकेला उपचारासाठी गेल्याचं वृत्त होतं. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना चिंता सतावत होती. धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनींही अभिनेत्याच्या प्रकृर्तीबाबत माहिती दिली होती. ते उपचारासाठी नाही तर रुटीन चेकअपसाठी गेल्याचं हेमा मालिनी म्हणाल्या होत्या. परंतु, तरीही धर्मेंद्र यांचे चाहते संभ्रमात होते. आता खुद्द धर्मेंद्र यांनीच ते ठीक असल्याचा पुरावा दिला आहे.

अमेरिकेत उपचारासाठी गेलेल्या धर्मेंद्र यांनी इन्स्टाग्रामवरुन त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ते कुत्र्याबरोबर मस्ती करताना दिसत आहेत. धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते एकदम फिट दिसत आहेत. या व्हिडिओला त्यांनी “यांच्याकडून काही शिकता आलं तर शिका, अन्यथा तेच बाजी मारतील,” असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडिओवर त्यांच्या चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. दरम्यान सनी देओलनेही अमेकरिकेतील पिझा पार्टीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, धर्मेंद्र उपचारासाठी नाही तर अमेरिकेत लेकाबरोबर व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेले आहेत. सनी देओलच्या टीमकडून याची माहिती देण्यात आली आहे. “सनी पाजी आई आणि वडिलांबरोबर अमेरिकेत व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेले आहेत. धर्मेंद्रजी एकदम तंदुरुस्त आहेत. काळजी करण्याचं काहीच कारण नाही,” असं त्या व्यक्तीने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

टॅग्स :धमेंद्रसनी देओलहेमा मालिनी