Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' कारणामुळे पहिल्या पत्नीने दिला नाही धर्मेंद्रला घटस्फोट; हेमा मालिनीचाही केला सवत म्हणून स्वीकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 16:37 IST

Dharmendra: धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत झालं होतं. त्यांना चार मुलंदेखील होती. मात्र, तरीदेखील त्यांनी हेमा मालिनीसोबत दुसर लग्न केलं.

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणजे धर्मेंद्र (dharmendra) आणि हेमामालिनी (hema malini). या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जितकी जमली तितकीच त्यांची ऑफस्क्रीनही जमली. त्यामुळेच पहिलं लग्न झालेलं असतानाही धर्मेंद्र यांनी हेमामालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं. विशेष म्हणजे पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता त्यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरा संसार थाटला. त्यामुळेच आता त्यांच्या पहिल्या पत्नीने त्यांना घटस्फोट का दिला नाही याची चर्चा रंगली आहे.

धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत झालं होतं. त्यांना चार मुलंदेखील होती. मात्र, तरीदेखील त्यांनी हेमा मालिनीसोबत दुसर लग्न केलं. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या प्रेमप्रकरणाविषयी प्रकाश कौर यांना कळल्यानंतर त्यांना प्रचंड त्रास झाला होता. मात्र, तरी त्यांनी धर्मेंद्र यांना घटस्फोट दिला नाही. परंतु, हा त्रास सहन करुनही त्यांनी घटस्फोट का दिला नाही यामागचं कारण आता समोर आलं आहे. स्टारडस्टला दिलेली त्यांची एक जुनी मुलाखत सध्या चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी धर्मेंद्र यांच्यापासून विभक्त न होण्यामागचं कारण सांगितलं.

"मी फारशी शिकलेली नाही आणि सुंदरही दिसत नाही. पण माझ्या मुलांच्या दृष्टीने मी जगातली सर्वोत्तम आई आहे. तसंच माझ्यासाठीही माझी मुलं जगातली सर्वोत्तम मुलं आहेत. मी माझ्या मुलांना चांगलं ओळखते आणि विश्वासाने सांगू शकते की माझी मुलं विनाकारण कोणाचंही नुकसान करणार नाहीत",असं प्रकाश कौर म्हणाल्या होत्या.

दरम्यान, प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांना सनी, बॉबी, अजिता, विजेता ही चार मुलं आहेत. धर्मेंद्र यांनी 1954 मध्ये प्रकाश कौर यांच्याशी लग्न केलं. तर, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी 1980 मध्ये लग्न केलं. 

टॅग्स :धमेंद्रबॉलिवूडसेलिब्रिटी