Join us

असिस्टंटच्या लग्नात पोहोचून धनुषने दिलं सरप्राईज! व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले- हा खरा थलायवा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 15:08 IST

धनुषचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोणताही चित्रपट तयार करण्यासाठी त्यामागे हजारो लोकांची टीम काम करत असते. ही सगळी माणसं पडद्यामागे काम करत असतात. त्यांचं महत्त्व कलाकारांच्या आयुष्यात खूप खास असते. यामुळेच जेव्हा टीम मेंबरच्या आयुष्यात एखादा खास प्रसंग येतो तेव्हा सेलेब्स त्यांच्या आनंदात आवर्जुन सामील होतात. साऊथ स्टार धनुषने त्याच्या असिस्टंटला असेच काहीसं सरप्राईज दिलं आहे. धनुषचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

धनुषचा असिस्टंट आनंद नुकताच लग्न बंधनात अडकला. आनंद अनेक दिवसांपासून धनुषसोबत काम करत असून दोघांमध्ये चांगले बॉन्डिंग आहे. याच कारणामुळे धनुषने आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून आनंदला सरप्राईज दिलं. धनुषने साधा जीन्स शर्ट आणि त्यासोबत काळी टोपी घातली होती. धनुष लग्नाच्या ठिकाणी पोहोचून नवविवाहित कपलला शुभेच्छा दिल्या दरम्यानता व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

धनुषचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याचे चाहते कौतुक करत आहेत. एका चाहत्याने लिहिले, 'सेलिब्रेटींना त्यांच्या टीम मेंबर्सला खूप सपोर्ट करताना पाहून बरे वाटते.' एका यूजरने धनुषला 'रियल थलायवा' असे लिहिले. 

 धनुष त्याच्या 'कॅप्टन मिलर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा अॅक्शन एपिक ड्रामा १५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत शिवा राजकुमार, प्रियांका अरुल मोहन, सुदीप किशन आदी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय तो आनंद एल राय यांचा 'तेरे इश्क में' चित्रपटही झळकणार आहे. 

टॅग्स :धनुष