Join us
Daily Top 2Weekly Top 5

 सासर्‍यांचा शेजारी बनणार सुपरस्टार धनुष, कोट्यवधी रूपये खर्चून बांधतोय अलिशान बंगला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 12:17 IST

हॉलिवूड सिनेमाचे शूटींग संपवून धनुष नुकताच भारतात परतला आहे आणि आता त्याचे स्वप्नातील घर बनवण्यात बिझी झाला आहे.

ठळक मुद्देरजनीकांत यांच्या मोठ्या मुलीसोबत धनुषने लग्न केले. धनुषपेक्षा रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या दोन वर्ष मोठी आहे.

साऊथ सुपरस्टार धनुष (Dhanush ) सध्या त्याच्या बॅक टू बॅक हिट चित्रपटांमुळे चर्चेत आहे. अलीकडे नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या त्याच्या ‘जगमे थंदिराम’ या सिनेमाला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यानंतर धनुष त्याच्या एका हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये बिझी झाला. या हॉलिवूड सिनेमाचे शूटींग संपवून धनुष नुकताच भारतात परतला आहे आणि आता त्याचे स्वप्नातील घर बनवण्यात बिझी झाला आहे. होय, मीडिया रिपोर्टनुसार, धनुष एक अलिशान घर बांधतो आहे. 

धनुषचे हे नवे घर त्याचे सासरे सुपरस्टार रजनीकांत यांच्या सोसायटीतच असणार आहे. चेन्नईच्या पॉइस गार्डन या पॉश वस्तीत धनुषच्या चार मजली घराचे बांधकाम सुरू आहे. यावर्षी फेब्रुवारीत या घराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम झाला होता. आता घराचे बांधकाम सुरू झाले आहे.चर्चा खरी मानाल तर या घरावर धनुष 150 कोटी रूपये खर्च करणार आहे. 19 हजार स्क्वेअर फुट जागेवर उभारण्यात येणा-या या घरात 4 मजले असतील. 150 कोटी खर्च करून उभारण्यात येणारे हे घर किती अलिशान असेल, याचा अंदाज तुम्ही बांधू शकताच.

धनुषने कधीच अभिनेता बनण्याचा विचार केला नव्हता. त्याला शेफ बनायचे होते. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की, शेफ बनण्यासाठी त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करण्याचा विचार केला होता. मात्र त्याच्या भावाने त्याला अभिनय क्षेत्रात करियर करण्यासाठी सांगितले. भावाचे ऐकून त्याने सिनेइंडस्ट्रीत नशीब आजमावण्याचे ठरवले.रजनीकांत यांच्या मोठ्या मुलीसोबत धनुषने लग्न केले. धनुषपेक्षा रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या दोन वर्ष मोठी आहे. ते दोघे पहिल्यांदा 2003 साली कढाल कोंडीयन या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान भेटले होते. 2004 साली दोघे विवाहबंधनात अडकले. धनुष भगवान शिव यांचा भक्त असून त्याने त्याच्या दोन्ही मुलांची नावे यत्र आणि लिंगा असे ठेवले आहे.

टॅग्स :धनुष