Join us

धनक-धनकला २५ लाख?

By admin | Updated: November 16, 2015 02:24 IST

मराठी चित्रपट वेगळा विषय हाताळण्याने जगभर पोहोचला आहेच, पण मराठी इंडस्ट्रीतील चित्रपटांचे बजेटही आता वाढले आहे, असे म्हणायला काही हरकत नाही

मराठी चित्रपट वेगळा विषय हाताळण्याने जगभर पोहोचला आहेच, पण मराठी इंडस्ट्रीतील चित्रपटांचे बजेटही आता वाढले आहे, असे म्हणायला काही हरकत नाही. बॉलीवूडप्रमाणेच मोठमोठे सेट उभारून मालिका आणि चित्रपटांचे शूटिंग केले जात आहे. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचाही वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. जसे की, जय मल्हार मालिकेमध्ये व्हीएफएक्स तंत्रज्ञानाचा वापर, नुकत्याच प्रदर्शित झालेला कट्यार काळजात घुसली चित्रपटातील भव्यदिव्य सेट, तर आता लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘उर्फी’ चित्रपटातील ‘धनक धनक’ गाणेही प्रचंड फेमस झाल्याचे आपल्याला माहीतच आहे... या फक्त गाण्यावर तब्बल २५ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे म्हणे. वाटलं ना आश्चर्य..! कारणही तसंच आहे म्हणा... तसं देवळाबाहेरील परिसरात साधूच्या वेशातील लोक आणि ढोल वाजवणाऱ्या नऊवारी साडीतील महिला, तर इतर काही लोकांच्या हातातील झेंडे, इतकाच काय ते म्हटलं तर खर्च दिसण्यासारखे सीन्स असताना, २५ लाख रुपये खर्च झाल्याचे ऐकल्यावर आश्चर्य वाटणे साहजिकच आहे. यापेक्षा कमी बजेटमध्ये संपूर्ण चित्रपट तयार होत असताना, केवळ एका गाण्यावर २५ लाख रुपये खर्च म्हणजे अंगापेक्षा बोंगा मोठा असल्याचेच वाटते, नाही का?