Join us
Daily Top 2Weekly Top 5

अजय गोगावले यांनी गायलेलं 'धडक'चं टायटल सॉंग रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 13:22 IST

अजय-अतुल जोडीपैकी अजय गोगावले आणि श्रेया घोशालने हे गाणं गायलं असून अजय-अतुल  यांनी संगीत दिलंय.

मुंबई : जान्हवी कपूर आणि इशान खट्टरच्या 'धडक' सिनेमाचं टायटल सॉंग रिलीज करण्यात आलं आहे. अजय-अतुल जोडीपैकी अजय गोगावले आणि श्रेया घोषालने हे गाणं गायलं असून अजय-अतुल  यांनी संगीत दिलंय. या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्यने लिहिले आहेत.

जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांची खास केमिस्ट्री या सिनेमात बघायला मिळत आहे. येत्या 20 जुलैला हा सिनेमा रिलीज होणार आहे. याआधी या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. त्यावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. आता गाण्यावरही संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. 

टॅग्स :धडक चित्रपटजान्हवी कपूर