Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘टीम बाघी’चा पाणी वाचविण्याचा निश्चय

By admin | Updated: April 10, 2016 01:43 IST

सध्या कोरडा दुष्काळ असल्याने सर्वत्र पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. नैसर्गिक स्रोत कधीही संपू नयेत आणि सातत्याने पाण्याचा वर्षाव होत राहावा या एकाच

सध्या कोरडा दुष्काळ असल्याने सर्वत्र पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. नैसर्गिक स्रोत कधीही संपू नयेत आणि सातत्याने पाण्याचा वर्षाव होत राहावा या एकाच उद्देशाने ‘बाघी’ चित्रपटाची टीम प्रेरित झाली होती. चित्रपटाच्या दरम्यान टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांच्यातील अनेक रोमँटिक सीन्स पावसातील आहेत. त्या वेळी टीमने निश्चय केला की, जास्तीत जास्त पावसातील सीन्स हे नैसर्गिकपणे पाऊस आल्यानंतरच शूट करावयाचे आहेत. निर्माता साजिद नादियादवाला आणि दिग्दर्शक साबिर खान हे याबाबतीत अत्यंत लक्षपूर्वक निर्णय घेत होते. त्यांनी टीमला तशा सूचना दिल्या होत्या की, पाण्याचा एक थेंबही वाया जायला नको आहे. चित्रपटाची शूटिंग केरळ आणि मान्सून ऋतूमध्ये नियोजित करण्यात आली होती. नैसर्गिक पाण्यातच जास्त शूटिंग व्हावी अशी टीम बाघीची इच्छा होती.