Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनुरागसोबत काम करण्याची कल्कीची इच्छा

By admin | Updated: November 9, 2014 23:43 IST

अभिनेत्री कल्की कोचलीनच्या मते अनुराग कश्यपशी तिचा घटस्फोट झाला असला, तरी ते दोघे अजूनही चांगले मित्र आहेत.

अभिनेत्री कल्की कोचलीनच्या मते अनुराग कश्यपशी तिचा घटस्फोट झाला असला, तरी ते दोघे अजूनही चांगले मित्र आहेत. अनुरागसोबत पुन्हा काम करता येईल, अशी तिला आशा आहे. अनुराग कश्यपने २००९ साली देव डी या चित्रपटातून कल्कीला बॉलीवूडमध्ये लाँच केले होते. दोन वर्षांनंतर दोघांनी लग्न केले; पण मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. खासगी जीवनाबाबत जेव्हा तिला प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तिने सार्वजनिक मंचावर या विषयावर बोलायला आवडत नाही, असे सांगितले. ती म्हणाली, ‘खासगी आयुष्य माझ्यासाठी खासगी बनले आहे. तुमचे आयुष्य कधीही सार्वजनिक होऊ शकत नाही हे मी शिकले आहे. काही गोष्टींची शिकवण उशिरा मिळते. मी माझ्या खासगी आयुष्याबाबत ओपन राहिले आहे; पण त्यामुळे बऱ्याच जणांना त्रास होतो. त्यामुळे काहीही प्रतिक्रिया न देणेच योग्य आहे.