Join us  

देसी गर्ल प्रियंका चोप्रा बनली एफबीआय एजंट

By admin | Published: May 14, 2015 1:25 PM

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आता एफबीआयची एजंट बनली आहे. अमेरिकन वाहिनीवरील क्वांटिका या मालिकेत प्रियंका चोप्राने एफबीआय एजंटची भूमिका साकारली आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. १४ - बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आता एफबीआयची एजंट बनली आहे. अमेरिकन वाहिनीवरील क्वांटिका या मालिकेत प्रियंका चोप्राने एफबीआय एजंटची भूमिका साकारली असून बॉलीवूडमधून थेट अमेरिकेतील मालिकेत झळकणा-या प्रियंकावर बॉलीवूडमधील कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 
अमेरिकन वाहिनीवर ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित 'क्वांटिको' ही मालिका सुरु होणार असून या मालिकेचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. बॉलीवूडमध्ये बोल्ड व बिनधास्त अंदाजासोबतच दमदार अभिनयाने छाप पाडणारी प्रियंका चोप्राने आता अमेरिकेतील मालिकेत झळकत सीमोल्लंघन केले आहे. या मालिकेत तिने एफबीआय एजंट एलेक्स पॅरिश ही भूमिका साकारली आहे. एफबीआयमध्ये भरती झालेल्या प्रियंकावर ९/११ च्या हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप  होतो व मग तिला तुरुंगात जावे लागते. यानंतर तुरुंगातून कशीबशी सुटका करत ती स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची धडपड करते असे या मालिकेचे कथानक असेल. या मालिकेत प्रियंकाचा बोल्ड अंदाजही बघायला मिळणार आहे. सोनाक्षी सिन्हा, रितेश देशमुख,अर्जून कपूर अशा अनेक कलाकारांनी प्रियंकाच्या अभिनयाचे कौतुक करत हॉलीवूडमधील पदार्पणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.