Join us

आलियाची मागणी वाढली

By admin | Updated: October 13, 2014 03:17 IST

इंटरनेटवर सर्वाधिक ‘सर्च’ केली जाणारी अभिनेत्री म्हणून आलिया भट्ट आता ओळखली जात आहे. आलियाला इंटरनेटवर सर्वाधिक सर्च करण्यात आल्याचे एका अ‍ॅन्टिवायरस बनविणा-या कंपनीचे म्हणणे आहे

इंटरनेटवर सर्वाधिक ‘सर्च’ केली जाणारी अभिनेत्री म्हणून आलिया भट्ट आता ओळखली जात आहे. आलियाला इंटरनेटवर सर्वाधिक सर्च करण्यात आल्याचे एका अ‍ॅन्टिवायरस बनविणाऱ्या कंपनीचे म्हणणे आहे. याबाबतीत आलियाने आमिर खान आणि प्रियंका चोपडासारख्या कलावंतांना मागे टाकले आहे. आमिर खान हा सर्चच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘पीके’च्या पोस्टरसाठी त्याला जास्तीत जास्त सर्च करण्यात आले. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या प्रियंकाला ‘मेरी कोम’साठी जास्त शोधण्यात आल्याचा दावा या कंपनीने केला आहे. ‘टू स्टेट्स’, ‘हायवे’सारखे चित्रपट हिट ठरल्यानंतर आलियाची मागणी वाढत असल्याचेच हे द्योतक आहे. आगामी चित्रपटाकड़ून तिला फार मोठ्या अपेक्षा आहेत.