विरूष्काच्या लग्नानंतर एक वर्षाच्या आतच दीपवीरचंही लग्न झालं. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचं लग्न जास्त लोकप्रिय की दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचे लग्न जास्त लोकप्रिय ह्यावर मीडियामध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार, असं समोर आलंय की, दीपिका-रणवीरच्या लग्नापेक्षा अनुष्का-विराटचं लग्न सर्वाधिक लोकप्रिय आणि सोशल मीडियावरून व्हायरल झालं. गेल्या वर्षी अनुष्का-विराटचे 11 डिसेंबरला लग्न झाले. 08 ते 14 डिसेंबर 2017 मध्ये आलेल्या आकडेवारीनुसार, ह्या दरम्यान ट्विटर, व्हायरल न्यूज़ आणि डिजिटल न्यूज रँकिंगमध्ये त्यांनी लोकप्रियतेत सर्वाधिक म्हणजेच 100 गुण मिळवले होते आणि ते नंबरवन स्थानी होते. फेसबुकवर मात्र 61 गुणांसह ही जोडी चौथ्या स्थानी होती.
स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, "विराटची लोकप्रियता वैश्विक आहे. ह्यामूळेच त्याच्या लग्नाची बातमी आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्र, वेबसाइट्स, न्यूजचॅनल्स, मनोरंजन और खेळविषयक पोर्टल्सवर झळकली. म्हणूनच दीपिका- रणवीरच्या लग्नाच्या तुलनेत विरूश्काचे लग्न जास्त लोकप्रिय ठरले."
अश्वनी पुढे सांगतात, “फेसबुकवर दीपिका आणि रणवीरची फॅन फॉलोविंग जास्त असल्याने विराट आणि अनुष्कापेक्षा दीपिका आणि रणवीरच्या लग्नाची चर्चा फेसबुकवर अधिक झाली. आता लवकरच प्रियांका-नीकचे लग्न होणार आहे. हे मचअवेटेड लग्न गेमचेंजर ठरू शकते.“