मला सासू हवी या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री दीप्ती देवीचा कणिक हा पहिलाच लघुपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. हा लघुपट अविनाश पिंगळे यांनी दिग्दर्शित केला आहे. रोजच्या खाण्यातील कणकेचा पौराणिक किंवा शास्त्रातील अर्थ समजवून सांगणारा कणिक हा लघुपट आहे. हा लघुपट १० ते १५ मिनिटांचा असल्याचे अभिनेत्री दीप्ती देवीने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले. दीप्ती सांगते, ‘मी यापूर्वी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण लघुपट मी पहिल्यांदाच करतेय. लघुपट करतानाचा अनुभव खूपच वेगळा होता. कारण लघुपटामध्ये खूप कमी वेळात तुम्हाला विषय मांडायचा असतो. त्यामुळे तिथे तुमच्या अभिनयाचा कस अधिक लागतो. लघुपटात काम करणे अतिशय आव्हानात्मक असते. पण त्याचसोबत लघुपटात आपले विचार मांडण्याची मोकळीकता असते. त्यामुळे हा एक वेगळा प्रकार मी खूप एन्जॉय केला. सध्या या लघुपटाच्या एडिटिंगचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हा लघुपट पाहायला आणखी थोडे दिवस तरी वाट पाहावी लागणार आहे.
दीप्ती देवी लघुपटामध्ये
By admin | Updated: September 1, 2016 02:18 IST