Join us

अजूनही दीपिकाच्या मनात ‘त्याच्या’बद्दल सॉफ्ट कॉर्नर?

By admin | Updated: September 8, 2016 03:35 IST

दीपिका पदुकोनचे लव्हलाइफ हा ‘बी टाउन’चा नेहमीचाच चर्चेचा आवडीचा विषय आहे. तिचे रणवीर सिंग आणि रणबीर कपूर यांच्यासोबतचे प्रेमही चर्चेत असते.

दीपिका पदुकोनचे लव्हलाइफ हा ‘बी टाउन’चा नेहमीचाच चर्चेचा आवडीचा विषय आहे. तिचे रणवीर सिंग आणि रणबीर कपूर यांच्यासोबतचे प्रेमही चर्चेत असते. मात्र, या दोघांनीही त्यांचे तिच्यासोबतचे नाते अद्याप मान्य केलेले नाही. हे दोघे तिच्या आयुष्यात येणारे काही पहिलेच नाहीत. या अगोदरही तिच्या आयुष्यात निहार पांड्या नावाचा एक तिचा बॉयफ्रेंड होता. ती मुंबईत सर्वप्रथम आली, तेव्हा ती अ‍ॅक्टिंग स्कूलमध्ये त्याला भेटली होती. अजूनही त्याच्याबद्दल तिच्या मनात सॉफ्ट कॉर्नर असल्याचे नुकतेच ‘युवराज फॅशन इव्हेंट’ येथे दिसून आले. ती या सोहळ्यात निहारसोबत जवळपास १० ते १५ मिनिटे बोलत उभी होती. त्यांनी एकमेकांना किस केले आणि हग केले. बरे, अजूनही तिच्या मनात जर निहारबद्दल सॉफ्ट कॉर्नर असेल, तर मग रणवीर आणि रणबीरचा पत्ता कट? नाही का?