Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीपिकाचे ‘ते’ स्केच म्हणे खोटे!

By admin | Updated: November 19, 2016 02:30 IST

दीपिका पदुकोणच्या ‘पद्मावती’ तील लूकबद्दल आज एक वेगळीच माहिती समोर आली.

दीपिका पदुकोणच्या ‘पद्मावती’ तील लूकबद्दल आज एक वेगळीच माहिती समोर आली. होय, काल-परवा या चित्रपटातील दीपिकाचा लूक कसा असेल, हे आम्ही तुम्हाला सांगितले होते. दीपिकाच्या लूक दर्शवणारे एक स्केचही आम्ही तुमच्यासोबत शेअर केले होते. हे स्केच म्हणजेच ‘पद्मावती’तील दीपिकाचे फर्स्ट लूक आहे, असे सांगितले जात होते. पण आता हे स्केच खोटे असल्याचे समोर आले आहे. होय, चित्रपटाच्या कास्टिंग डायरेक्टर श्रुती महाजन हिने याबाबत खुलासा केला. सोशल मीडियावर हे स्केच व्हायरल झाले होते. यात दीपिका महाराणीच्या भूमिकेत दिसते आहे. हे स्केच सोशल मीडियावर अपलोड होताच, लोकांनी ते शेअर करायला सुरुवात केली. लोकांनी हे स्केच खरे मानले कारण, ते ‘पद्मावती’ चे कास्टिंग डायरेक्टर श्रुतीने तिच्या फेसबुक अकाऊंटवर अपलोड केले होते. मात्र, हे स्केच माझ्या अकाऊंटवरून नाही तर माझ्या बनावट अकाऊंटवरून अपलोड झाले, ते खोटे आहे, असे श्रुतीने स्पष्ट केले.