Join us

असा असेल ‘पद्मावती’तील दीपिकाचा लूक!

By admin | Updated: November 17, 2016 06:03 IST

दीपिका पदुकोण, रणवीरसिंह आणि शाहीद कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘पद्मावती’ सध्या बराच चर्चेत आहे. सर्वांत आधी रणवीर आणि शाहीद

दीपिका पदुकोण, रणवीरसिंह आणि शाहीद कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘पद्मावती’ सध्या बराच चर्चेत आहे. सर्वांत आधी रणवीर आणि शाहीद यांच्यात रंगलेले ‘कोल्डवॉर’. नंतर दीपिकाला रणवीरपेक्षा मिळालेले अधिकचे मानधन अशा अनेक गोष्टींमुळे ‘पद्मावती’ चर्चेत आला. आता या चित्रपटातील लूक सोशल मीडियावर वाव्हरल झालेत. अलीकडे रणवीरने या चित्रपटातील त्याचा लूक सोशल मीडियावर लीक केला होता. त्यामुळे दीपिका आणि शाहीद यांच्या चित्रपटातील लुक्सबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. पण, आता ती प्रतीक्षाही संपलीय. होय, दीपिकाचा लूकही प्रसिद्ध करण्यात आला आहे. ‘पद्मावती’च्या कास्टिंग डायरेक्टरने दीपिकाचा लूक एका स्केचच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर केला आहे. या स्केचमध्ये दीपिका एकदम रॉयल लूकमध्ये आहे. राजपुती दागदागिन्यांनी सजलेल्या दीपिकाचे हे स्केच पाहून ‘पद्मावती’मधील दीपिकाच्या लूकची कल्पना तुम्ही करू शकता. दीपिका या चित्रपटात राणी पद्मावतीची भूमिका साकारताना दिसणार आहे. शाहीद कपूर तिच्या पतीची, तर रणवीर अल्लाऊद्दीन खिल्जीची भूमिका साकारणार आहेत. संजय लीला भन्साळी त्यांच्या चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या लुक्सबद्दल अतिशय सजग असतात. त्यावर प्रचंड मेहनत घेतात, हे आपल्याला ठाऊक आहेच. त्यांचा ‘बाजीराव-मस्तानी’ हा चित्रपट पाहून आपल्याला त्याचा अंदाज आलाच आहे. आता ‘पद्मावती’ची प्रतीक्षा आहे. दीपिकाला रॉयल लूकमध्ये पाहण्यास तिचे चाहते उत्सुक आहे.