Join us

दीपिकाचा कुर्ता आणि कंगनाची जीन्स

By admin | Updated: July 2, 2015 04:05 IST

विशीतल्या आणि तिशीतल्या तरुणींसाठी पिकू कुर्ता ही नवी फॅशन बनलीय. पिकू चित्रपटात दीपिकाचा पायाच्या घोट्यापर्यंतचा मोकळा वाटणारा पायजमाही माहोल करतोय.

विशीतल्या आणि तिशीतल्या तरुणींसाठी पिकू कुर्ता ही नवी फॅशन बनलीय. पिकू चित्रपटात दीपिकाचा पायाच्या घोट्यापर्यंतचा मोकळा वाटणारा पायजमाही माहोल करतोय. कंगना राणावतही आपल्या हटके फॅशनने युवकांवर आपला प्रभाव टाकण्यात यशस्वी ठरलीय. कुर्ता आणि जीन्समध्येही स्पंकी आणि कूल दिसू शकतो हे तिने दाखवून दिलंय. पिकूच्या स्टाईलपेक्षा वेगळी अशी इंडो-चीक स्टाईल तिनं दाखवलीय. तिनं परिधान केलेला सलवार आणि कुर्ता देशभरातील स्टोअर्समध्ये दिसायला लागला आहे.