Join us
Daily Top 2Weekly Top 5

'द रिटर्न ऑफ एक्सँडर केज’ च्या सेटवरील दीपिकाचा हॉट लूक

By admin | Updated: March 18, 2016 18:13 IST

दीपिका पदुकोणच्या बहुचर्चित XXX: The Return of Xander Cage या चित्रपटातील सेटवरील एक हॉट फोटो अभिनेता विन डिझलने पोस्ट केला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १८  - दीपिका पदुकोणच्या बहुचर्चित XXX: The Return of Xander Cage या चित्रपटातील सेटवरील एक हॉट फोटो अभिनेता विन डिझलने पोस्ट केला आहे. हा फोटो दीपिकाने मागच्यावर्षी पोस्ट केलेल्या फोटोशी मिळता जुळता आहे. 
 
आपल्या आगामी हॉलिवूड चित्रपटाची चाहत्यांना माहिती व्हावी यासाठी दीपिकाने फोटो पोस्ट केला होता. दिपिकाचा हा पहिलाच हॉलिवूड चित्रपट आहे. नव्या फोटोमध्ये दीपिका ४८ वर्षीय विन डिझेलच्या कानात काही तरी सांगत आहे. 
 
विन डीजेल यामध्ये 'Xander Cage' ची भूमिका निभावताना दिसणार आहे तर दीपिका 'Serena'च्या भूमिकेत दिसणार आहे. कॅनडामध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. या चित्रपटासाठी दीपिकाने खूप मेहनत घेतली असून काही दिवसांपूर्वी तिच्या जिमममधील ट्रेनिंगचे फोटोही सोशल साईट्सवर झळकले होते.