Join us

दीपिका रणबीर एकत्र?

By admin | Updated: May 25, 2015 23:21 IST

‘पिकू’ फेम दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर पुन्हा एकत्र येणार आहेत? वाचून धक्का बसला ना? आता रणबीरची कतरिना आणि दिप्सचा रणवीर सिंग या दोघांचे काय? हा विचार मनात आलाच असेल ना.

‘पिकू’ फेम दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर पुन्हा एकत्र येणार आहेत? वाचून धक्का बसला ना? आता रणबीरची कतरिना आणि दिप्सचा रणवीर सिंग या दोघांचे काय? हा विचार मनात आलाच असेल ना. अहो, त्यांच्या रियल लाइफमध्ये हा बदल घडला नाही. हे दोघेही राजकुमार हिरानी यांच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. संजय दत्तच्या आयुष्यावर चित्रपट काढण्याचा विचार हिरानी करत असल्याची चर्चा आहे. याबाबत सर्वांनी अळीमिळी गुपचिळी पाळली असली, तरी यासाठीच दीपिकाची निवड झाल्याची खबर आहे.