Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीपिका-प्रियंकातनृत्याचा मुकाबला

By admin | Updated: August 15, 2014 23:50 IST

दीपिका पदुकोन आणि प्रियंका चोप्रा आजवर एकाही चित्रपटात सोबत दिसल्या नाहीत

दीपिका पदुकोन आणि प्रियंका चोप्रा आजवर एकाही चित्रपटात सोबत दिसल्या नाहीत. ‘रामलीला’ या चित्रपटात प्रियंका एका आयटम साँगपुरती होती खरी; पण दीपिकासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी तिला मिळाली नाही. ‘बाजीराव मस्तानी’मध्ये मात्र या दोघी एका डान्स सिक्वेंससाठी एकत्र येणार आहेत. भन्साळींच्या ‘देवदास’ या चित्रपटात पारो आणि चंद्रमुखी यांच्यात ड्रामॅटिक डायलॉग्ज होते, शिवाय दोघी एकत्र ‘डोला रे डोला’च्या तालावर थिरकल्याही होत्या. ‘बाजीराव मस्तानी’त काशीबाईच्या भूमिकेत प्रियंका चोप्रा असून मस्तानीची भूमिका दीपिका पदुकोन करीत आहे. दोघींवर डान्स सिक्वेंस शूट केला जाणार आहे.