Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रॉकस्टार'साठी नर्गिस फाखरी नाही तर बॉलिवूडची 'ही' टॉप अभिनेत्री होती पहिली पसंत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 07:00 IST

दिग्दर्शिक इम्तियाज अलीची रॉकस्टारसाठी पहिली पसंती नव्हती.

रॉकस्टार सिनेमात आपल्याला रणबीर कपूरच्या अपोझिट नर्गिस फाखरी आपल्याला दिसली होती. नर्गिसच्या वाटेला फारसे सिनेमे आले नाहीत. ती तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफला घेऊन जास्त चर्चेत राहिली. आजतकच्या रिपोर्टनुसार दिग्दर्शिक इम्तियाज अलीची रॉकस्टारसाठी पहिली पसंती नर्गिस नसून दीपिका पादुकोण होती.

इम्तियाज अलीने दीपिकासाठी लिहिलेल्या एक नोटमध्ये या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला आहे. इम्तियाजने यात त्याच्या आणि दीपिकाच्या पहिल्या भेटीबाबत लिहिले आहे. ''हॉटेलच्या आवारात गाडीतून उतरताना तिने माझ्याकडे पाहिले. मला लगेच कळले की ही तिच मुलगी आहे जिला भेटण्यासाठी मी आलोय. तसेच तिला देखील कळले हा तोच दिग्दर्शक आहे ज्याला भेटण्यासाठी ती आलीय.''  पुढे तो लिहितो, तोपर्यंत दीपिकाचा एक ही सिनेमा रिलीज झाला नव्हता. मी तिला रॉकस्टार सिनेमा संदर्भात भेटायला गेलो होतो. मला रॉकस्टारमध्ये तिला कास्ट करायचे होते मात्र पुढच्या एकावर्षात तो तयार झाला नाही. मी इतर सिनेमांमध्ये तिच्यासोबत काम केले आहे.   

दीपिकाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, लवकरच ती शकुन बत्रा यांच्या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट खूप इंटरेस्टिंग असून माणूस व नाती यांच्यावर आधारलेला असल्याचे दीपिकाने सांगितले. शकुन बत्रा यांच्या आगामी चित्रपटाचे नाव अजून गुलदस्त्यात असले तरीही दीपिका पादुकोण सोबत आपल्याला सिद्धान्त चतुर्वेदी आणि अनन्या पांडे ही यापूर्वी पडद्यावर कधीही न दिसलेली तिकडी पाहता येणार आहे. हा चित्रपट 12 फेब्रुवारी, 2021 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोणनर्गिस फाकरी