Join us

दीपिका पदुकोण -रणवीर सिंगचे नोव्हेंबरमध्ये शुभमंगल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 06:12 IST

नवी दिल्ली: रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन या आघाडीच्या बॉलीवूड कलाकारांचे शुभमंगल १४ व १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ...

नवी दिल्ली: रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन या आघाडीच्या बॉलीवूड कलाकारांचे शुभमंगल १४ व १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. दोघांनीही सोशल मीडियावर इंग्रजी व हिंदीमध्ये पोस्ट टाकून ही शुभवार्ता जाहीर केली. असंख्य चाहत्यांचे आभार मानताना त्यांनी म्हटले की, ‘तुमचे प्रेम, आशीर्वाद घेऊन आम्ही दोघे प्रेम, निष्ठा, मैत्री व सहजीवनाचा हा नवा अध्याय सुरू करणार आहोत.’ रणवीर व दीपिका संजय लीला भन्साळींच्या ‘रामलीला’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. तेव्हापासून या कपलच्या लव्हलाईफची चर्चा आहे. दोघांच्याही कामाबद्दल बोलायचे तर रणवीर सध्या ‘सिम्बा’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय ‘गली ब्वॉय’ आणि १९९३ व्या क्रिकेट वर्ल्ड कप विजयावर आधारित ‘८३’ या चित्रपटातही तो बिझी आहे. इतकेच नाही तर करण जोहरच्या ‘तख्त’ या मल्टीस्टारर चित्रपटातही त्याची वर्णी लागली आहे. दीपिकाचे म्हणाल तर ‘पद्मावत’नंतर तिने दिग्दर्शिका  मेघना गुलजारचा नवा प्रोजेक्ट साईन केला आहे. मेघना गुलजार ‘राजी’, ‘तलवार’ अशा दमदार चित्रपटांसाठी ओळखली जाते. मेघनाच्या ‘राजी’ या चित्रपटात आलिया भट्ट आणि विकी कौशल दिसले होते. मेघनाचा हा चित्रपट समीक्षक व प्रेक्षक दोघांनीही डोक्यावर घेतला होता. ‘राजी’नंतर मेघना अ‍ॅसिड हल्ल्यासारख्या संवेदनशील मुद्यावर चित्रपट घेऊन येतेय. यात दीपिकाची वर्णी लागली आहे. साहजिकचं या चित्रपटात दीपिका अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितेची भूमिका साकारताना दिसणार आहे. तिची ही व्यक्तिरेखा अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी हिच्यापासून प्रेरित असेल.

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंग