Join us

या अभिनेत्रीच्या कपड्यांची अवघ्या दोन तासांत झाली विक्री, कारण वाचून तुम्हीही कराल तिचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 06:30 IST

लवकरच ही अभिनेत्री निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोण ही ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. अभिनयाबरोबरच मानसिक आरोग्याविषयी तिनं जगजागृती मोहीम राबवली आहे. तिनं आपल्या 'द लिव लव लाफ फाउंडेशन'ला मदत करण्यासाठी नवा उपक्रम राबवला आहे.  दीपिकानं सोशल मीडियाद्वारे या संकल्पनेची माहिती दिली. तिनं संकेतस्थळाद्वारे आपलं कपडे विक्रीसाठी ठेवलं आणि अवघ्या २ तासांत यावरील सर्व कपडे आणि इतर वस्तू विकल्या गेल्या.   

दर महिन्याला दीपिका तिचे काही खास कपडे, ज्वेलरी आपल्या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवणार आहे. कपडे, ज्वेलरीच्या विक्रीतून आलेली रक्कम दीपिका तिची स्वयंसेवी संस्था 'द लिव लव लाफ फाउंडेशन'साठी वापरणार आहे.

 

दीपिकानं सोशल मीडियाद्वारे तिच्या तमाम चाहत्यांचे आभार मानले आहेत. दीपिकानं स्वत: 'द लिव लव लाफ फाउंडेशन'ची स्थापना केली. यासंस्थेच्या माध्यमातून मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यात येते तसेच डिप्रेषनमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर येण्यासाठी मदतीचा हात दिला जातो. 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले, दीपिका पती रणवीर सिंग सोबत‘83’ चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहे. यात रणवीर सिंग भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. तर दीपिका त्याच्या आॅनस्क्रीन पत्नीची म्हणजेच कपिल यांची पत्नी रोमी भाटियाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. याशिवाय दीपिकाचा ‘छपाक’ हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंग