Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा होमीच्या चित्रपटात दीपिका

By admin | Updated: October 17, 2014 00:42 IST

दिग्दर्शक होमी अदजानिया दीपिका पदुकोनला घेऊन आणखी एक चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहेत.

दिग्दर्शक होमी अदजानिया दीपिका पदुकोनला घेऊन आणखी एक चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहेत. होमीच्या कॉकटेल आणि नुकतेच रिलीज झालेल्या फाइंडिंग फेनी या चित्रपटात दीपिका दिसली आहे. होमी आणि दीपिका यांचे चांगले संबंध आहेत. त्याने महिला सशक्तीकरणावर आधारित असलेल्या एका शॉर्ट फिल्मसाठी दीपिकाशी संपर्क केला आहे. दीपिकालाही त्याचा हा विचार आवडला असून, होमीची पहिली पसंत असल्याचा तिला आनंद आहे. सध्या या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. या वर्षाच्या अखेरीस चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे.