दीपिका पदुकोण ही तिचा आगामी हॉलीवूड चित्रपट ‘ट्रिपल एक्स : द रीटर्न आॅफ झांडर केज’मध्ये दिसणार. तिच्या या शूटिंगबद्दलच्या घडामोडी सांगताना म्हणते, ‘खरं तर एक गोष्ट महत्त्वाची अशी की, मी कुठेही गेले तरी माझे कपडे मीच धूत असते आणि मी त्याबाबतीत खूप गंभीर आहे. मला माझी कामे स्वत: करता आली तर मी खूपच खूश होते. मी स्वत: मला लागणारे सामान खरेदीस जात असे. जेवण बनवणे आणि कपडे धुणे ही कामे मी करायची.’ पुढे ती म्हणते, ‘याअगोदरही मला हॉलीवूडमधून अनेक संधी आल्या होत्या. पण तेव्हा मी तयार नव्हते. प्रश्न भूमिका किती आहे याबद्दल नाही तर प्रत्येक भूमिका ही महत्त्वाची असते. कलाकार त्याला कसा सजवतो यावर आधारित असते.’
दीपिका स्वत:ची कामे स्वत:च करते!
By admin | Updated: July 3, 2016 02:23 IST