Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिपीकाच्या हॉट फोटोशूटवर भन्साळी नाराज

By admin | Updated: June 16, 2017 13:19 IST

पद्मावती चित्रपटाचं शुटिंग सुरु असताना अशा प्रकारचा बोल्ड फोटोशूट करणं संजय लीला भन्साळींना पसंत पडलेलं नाही

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - अभिनेत्री दिपीका पदुकोण सध्या बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही आपल्या दमदार अभिनयामुळे चांगलीच चर्चेत आहे. "XXX" चित्रपटातील तिच्या अभियनावर खुश होऊन दिग्दर्शक डीजे करुसो यांनी तिला पुन्हा एकदा "XXX" च्या सिक्वेलमध्ये कास्ट करण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती आहे. याशिवाय नुकतंच दिपीकाने केलेल्या एका बोल्ड फोटोशुटमूळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 
 
(दीपिकाच्या त्या हॉट फोटोमुळे चाहते नाराज)
 
दिपीकाने केलेला बोल्ड फोटोशूट एकीकडे चर्चेचा विषय झाला असताना काही नेटीझन्सना मात्र हे अजिबात आवडलं नसून त्यांनी टिका केली आहे. चाहते नाराज असून त्यांनी सोशल मीडियावर ट्रोल करण्यासही सुरुवात केली आहे. आधीच चाहत्यांच्या नाराजीचा सामना करावा लागत असलेल्या दिपीकाला दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या नाराजीलाही सामोरं जावं लागत आहे. 
 
दिपीकाने केलेला बोल्ड फोटोशूट संजय लीला भन्साळींना अजिबात आवडला नसल्याची चर्चा आहे. पद्मावती चित्रपटाचं शुटिंग सुरु असताना अशा प्रकारचा बोल्ड फोटोशूट करणं संजय लीला भन्साळींना पसंत पडलेलं नाही. या फोटोंवर अनेक राजपूतांनी नाराजी व्यक्त केली असून ही अभिनेत्री महाराणी पद्मावतीची भूमिका कशी काय निभावू शकते ? असा सवाल विचारला आहे. 
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "दिपीका पद्मावती चित्रपटात आपल्या प्राचीन संस्कृतीचं दर्शन घडवणार असून, पद्मावतीसारख्या स्वाभिमानी राणीची भूमिका निभावणार आहे. अशा परिस्थितीत हा बोल्ड फोटोशूट करणं संजय भन्साळींना आवडलेलं नाही. या फोटोशूटमुळे लोक चित्रपटाला गांभीर्यांने घेणार नाहीत अशी भीती त्यांना वाटत आहे. तसंच राजपूत नाराज होऊ शकतात. याआधाही चित्रपटावरुन अनेकदा वाद झाले असून सेटवर तोडफोडही झाली आहे". 
 
दीपिकाने अलीकडेच मॅक्झीन या पुस्तकासाठी फोटो शूट केले होते. त्यातीलच एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याला जस्ट पोस्टेड ए फोटो असे कॅप्शन तिने दिले होते.