छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चश्मा'. या मालिकेतील अनेक भूमिका प्रेक्षकांमध्ये गाजल्या. त्यातलीच लोकप्रिय झालेली भूमिका म्हणदे दयाबेन. अभिनेत्री दिशा वकानी हिने दयाबेनची भूमिका जिवंत केली. विशेष म्हणजे दयाबेनची भूमिका गाजत असतांनाच दिशाने या मालिकेतून काढता पाय घेतला. त्यानंतर आजपर्यंत ही भूमिका कोणीही साकारलेली नाही. इतकंच नाही तर दिशा या मालिकेत पुन्हा येईल अशा अनेक चर्चाही रंगल्या. मात्र, या मालिकेत दिशा कधीही झळकणार नाही, असा खुलासा मालिकेतील एका अभिनेत्रीने केला आहे.
'तारक मेहता'मध्ये मिसेस सोढीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्रीने दिशाविषयी काही गोष्टींचा खुलासा केला आहे. 'बॉलिवूड बबला' दिलेल्या मुलाखतीमध्ये जेनिफरने दिशाच्या वैवाहिक आयुष्यावर भाष्य केलं. इतकंच नाही तर दिशाच्या कमबॅकविषयी ज्या चर्चा होतात त्या केवळ मार्केटिंगसाठी केलं जातं, असंही तिने यावेळी स्पष्ट केलं.या मुलाखतीमध्ये जेनिफरला दिशाच्या कमबॅकविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, ''ती फक्त मार्केटिंग स्ट्रॅटिजी आहे. लोकांना कसं गुंतवून ठेवायचं यासाठी हे सगळं केलं जातं. ज्यावेळी मी शोमध्ये होते तेव्हा एका दिल्लीच्या मुलीचं दया बेनच्या भूमिकेसाठी ऑडिशन घेतलं होतं. जवळपास २ वर्ष तिला या भूमिकेसाठी ब्लॉक केलं होतं. आम्ही तिच्यासोबत काही सीनचं शूटही केलं होतं. तिने सुद्धा या भूमिकेसाठी १०० टक्के दिले होते. परंतु, तिचं वय २७-२८ असेल त्यामुळे दिलीपजींसमोर ती खूपच लहान वाटायची त्यामुळे तिला शोमधून बाहेर काढलं'', असं जेनिफर म्हणाली.
पुढे ती म्हणते, ''दिशा वकानी या पुढे कधीही या मालिकेत दिसणार नाही. ती २०२१ मध्ये कमबॅक करणार होती. मात्र,त्यानंतर काय झालं माहित नाही. ती आलीच नाही. तिच्या सासरच्या मंडळींकडून तिच्यावर काही बंधने आहेत. तिने रात्रीच्यावेळी शूट करावं किंवा उशीरापर्यंत काम करावं हे तिच्या सासरच्या मंडळींना मान्य नव्हतं. मी आणि सोनालिका जोशीने (भिडे भाभी) असित मोदींना दिशाच्या घरी जाऊन शूट करता येईल असा सल्लाही दिला होता. मात्र, त्यांना तो मान्य नव्हता.''
दरम्यान, दिशाने २०१७ मध्ये तारक मेहता ही मालिका सोडली. त्यानंतर ती कोणत्याही अन्य मालिकेत झळकलेली नाही. सध्या ती हाऊस वाईफ असून तिच्या दोन मुलांचा सांभाळ करत आहे. तर, जेनिफरनेदेखील जवळपास १५ वर्ष या मालिकेत काम केलं. त्यानंतर २०२३ मध्ये तिने मालिकेतून काढता पाय घेतला. मालिका सोडल्यानंतर जेनिफरने मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्यावर अनेक आरोप केले होते.
Web Summary : Jennifer Mistry reveals Dayaben may never return to 'Taarak Mehta'. In-laws' restrictions and marketing tactics hinder her comeback. She left in 2017 and is now a homemaker.
Web Summary : जेनिफर मिस्त्री ने खुलासा किया कि दयाबेन शायद 'तारक मेहता' में कभी नहीं लौटेंगी। ससुराल वालों के प्रतिबंध और विपणन रणनीति उनकी वापसी में बाधा डालते हैं। उन्होंने 2017 में शो छोड़ दिया और अब वह एक गृहिणी हैं।