Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस 14' या दिवशी येणार भेटीला, या कलाकारांची वर्णी लागू शकते घरात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 17:24 IST

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉसच्या चौदाव्या सीझनची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉसच्या चौदाव्या सीझनची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या शो विषयी बऱ्याच चर्चा ऐकायला मिळत आहेत. आता 'बिग बॉस 14'च्या प्रीमियर डेटबाबत नवीन माहिती समोर आली आहे.

सलमान खान होस्ट करत असलेला बिग बॉस शोचा चौदावा सीजन पुढील महिन्यात सप्टेंबरमध्ये सुरू होण्याची शक्‍यता आहे. बिग बॉसचा आगामी सीजन 20 सप्टेंबरला टेलीकास्ट केला जाणार आहे. परंतु निर्मात्यांकडून अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. मात्र, कलर्सवरील हा शो सप्टेंबरमध्ये लॉन्च होणार आहे. सलमान खानचे चाहते या शोची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे या शोमध्ये खूप बदल करण्यात आलेले आहेत. बिग बॉस 14मध्ये जंगलची थीम पाहायला मिळणार आहे. यात मेन हायलाइट लॉकडाउन असणार आहे. तसेच 'बिग बॉस 14 होगा रॉकिंग' अशी त्याची टॅगलाइन असल्याची चर्चा आहे.

बिग बॉसच्या सेटवर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व खबरदारी घेण्यात येणार आहे. तसेच ट्रॅव्हल हिस्ट्री असलेल्या कंटेस्टेंटला सहभागी करून घेण्यात येणार नाही. तसेच त्यांची कोरोना टेस्टही करण्यात येणार आहे. या शोमध्ये निया शर्मा, व्हिव्हियन डिसेना, सुगंधा मिश्रा, अविनाश मुखर्जी, शिरीन मिर्झा सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :बिग बॉससलमान खान