अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे रंगणाऱ्या मानाच्या इंडियन फिल्म फेस्टिव्हल आॅफ लॉस एंजेलिसमध्ये निशांत रॉय बोम्बार्डे लिखित आणि दिग्दर्शित दारवठा या शॉर्टफिल्मची शॉर्ट या विभागांतर्गत निवड करण्यात आली आहे, तसेच या फेस्टिव्हलमध्ये फिल्मचा वर्ल्ड प्रीमियरदेखील होणार आहे.दारवठा ही गोष्ट आहे किशोरवयीन पंकजची, जो त्याच्या मित्रांपेक्षा थोडा वेगळा आहे. वेगळा, कारण त्याला त्याच्या वयाच्या मुलांसोबत खेळण्यात रस नाही. त्याऐवजी तो डान्स करणे, हातावर मेहंदी काढून घेणे, आईच्या मेकअप सोबत खेळणे या सर्व गोष्टीत जास्त रमतो. एका बाजूला भारतीय पुरुषप्रधान समाज आणि दुसऱ्या बाजूला त्याला लैंगिकतेविषयी वाटणारी उत्सुकता हे द्वंद्व त्याच्यासमोर आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये निशांत भावसारसोबतच नंदिता पाटकर, अनुराग वरळीकर, संजय पूरकर, रुची शर्मा आदी कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
‘दारवठा’ लॉस एंजेलिस फेस्टिव्हलमध्ये
By admin | Updated: March 7, 2016 02:34 IST