Join us
Daily Top 2Weekly Top 5

डार्लिंग डीन श्वेता शिंदेची स्टाईल स्टेटमेंट ठरतेय सुपरहिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 09:00 IST

श्वेता शिंदेच्या स्टाईल स्टेटमेंटची सध्या चर्चा होताना दिसते आहे

डॉक्टर डॉन ही मालिका नुकतीच झी युवा वाहिनीवर दाखल झाली आहे. डॉक्टर डॉन आणि त्याची डार्लिंग डीन अल्पावधीतच सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत. मोठ्या कालावधीनंतर अभिनेत्री श्वेता शिंदे हिने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. अर्थात, इतक्या वर्षांनंतर सुद्धा तिच्या दिलखेचक अदा आणि लक्षवेधी सौंदर्य यात फरक पडलेला नाही. 

आजही श्वेता शिंदेचा चाहतावर्ग तिच्या सौंदर्याची आणि अफलातून लूक्सची चर्चा करताना दिसत आहे. तिची फॅशन आणि स्टाईल स्टेटमेंट यांचा प्रभाव आजही सगळ्यांवर पडत आहे.

एका अतिशय शिस्तप्रिय अशा डीनची भूमिका श्वेता साकारते आहे. पण, मेडिकल कॉलेजची डीन मोनिका, तिच्या कडक शिस्तीपेक्षाही जास्त, तिच्या फॅशनमुळे चर्चेत आहे. नेहमी नवी साडी नेसून पडद्यावर येणारी श्वेता, त्या साडीला साजेसे दागिने आणि मेकअप यांचा योग्य वापर करते.

उत्तम अभिनयाच्या बरोबरीनेच, तिच्या लुकची सुद्धा खूप प्रशंसा होत आहे. 'बोल्ड अँड ब्युटीफुल' श्वेता, फॅशनच्या बाबतीत ऑफस्क्रीन सुद्धा मागे नाही. म्हणूनच, तिचे स्टाईल स्टेटमेंट प्रभावी ठरले आहे.

या संपूर्ण मालिकेत ती एकदाही तीच साडी पुन्हा नेसणार नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे रोज तिची नवी स्टाईल पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

डॉक्टर डॉन आणि त्याच्या डार्लिंग डीनची प्रेम कहाणी व श्वेताची नवनवीन स्टाईल पाहण्यासाठी मालिका पहावी लागेल.

टॅग्स :श्वेता शिंदेदेवदत्त नागे