Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबो..! सैफ अली खानने बेबोचं नाव घेऊन सांगितले बेडरूम सीक्रेट, ऐकताच साराने केले कान बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 11:20 IST

एका शोमध्ये सैफने बेडरूम सीक्रेटचा खुलासा केला होता. जे ऐकून सारा कावरीबावरी झाली होती की तिने कान बंद करून घेतले होते.

सध्या सैफ अली खान आणि करीना कपूर आपल्या छोट्या पाहुण्याच्या स्वागतामध्ये व्यग्र आहेत. यादरम्यान त्यांच्या घरी त्यांचे नातेवाईक आणि जवळचे लोक जात आहेत. नुकतीच सारा अली खान तैमूरचा छोटा भावाला भेटण्यासाठी गेली. त्यावेळी ती खूप गिफ्ट्स घेऊन जाताना दिसली. असे सांगितले जाते की सारा, सैफ आणि करीना खूप क्लोज आहेत. त्यामुळे प्रत्येक स्पेशल दिवशी सारा सैफीनाला भेटण्यासाठी जाते. 

सैफ अली खान आणि सारा अली खान एका लोकप्रिय चॅट शोमध्ये एकत्र दिसले होते. या शोमध्ये सैफने बेडरूम सीक्रेटचा खुलासा केला होता. जे ऐकून सारा कावरीबावरी झाली होती की तिने कान बंद करून घेतले होते.

खरेतर सैफ अली खान त्याची लेक सारा अली खानसोबत करण जोहरचा चॅट शो कॉफी विद करणमध्ये गेला होता. यादरम्यान बाप लेकीमधली चांगली केमिस्ट्री पहायला मिळाली होती. या शोमध्ये साराने पहिल्यांदा कार्तिक आर्यन आवडत असल्याचे सांगितले होते. यादरम्यान शोमध्ये करण जोहरने करीनाच्या जिम लूकबद्दल बोलला तेव्हा सैफने त्यांच्या बेडरूम सीक्रेटबद्दल सांगायला सुरूवात केली. करण जोहर म्हणाला की, करीनाचे जिम लूक्स खूप हिट आहे. हे ऐकून सैफ म्हणाला की हो मला माहित आहे कारण मला बेडरूममध्ये येता जाता दिसते.

सैफ अली खानची ही गोष्ट ऐकून सारा अली खान कावरीबावरी झाली आणि तिने कान बंद केले. साराचे हे रिएक्शन पाहून सैफ आणि करण जोहर हसू लागले. याच शोमध्ये सारा अली खानने खुलासा केला होता की, तिला कार्तिक आर्यन आवडतो आणि तिला त्याच्यासोबत डेटवर जायचे आहे.

टॅग्स :सैफ अली खान सारा अली खानकरिना कपूरकरण जोहर